India Alliance meeting Sarkarnama
देश

INDIA alliance news : भाजपचे मनसुबे उधळले? इंडिया आघाडी एकजुटच; 21 नव्हे 23 पक्षांची थेट सरन्यायाधीशांकडे धाव

Opposition parties India, Election Commission controversy : आप आणि द्रमुकने काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप घेत बैठकीला जाणे टाळले होते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने द्रमुकमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Rajanand More

CJI letter opposition parties : भाजपकडून लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतियांश सदस्यांचा आकडा गाठण्यासाठी विरोधी पक्षात फूट पाडली जात असल्याचा आरोप सर्वच विरोधी पक्षांकडून केला जात आहे. तर इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकजूट नसल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. आघाडीच्या ८ जून रोजी झालेल्या बैठकीकडे द्रमुकसह आम आदमी पक्षाने पाठ फिरविली होती. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते.

इंडिया आघाडीच्या २२ दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत २१ पक्षांचे नेते हजर होते. आता इंडिया आघाडीकडून मंगळवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना विविध मुद्द्यांवर पत्र लिहिण्यात आले आहे. या पक्षावर २३ पक्षांच्या नेत्यांनी सह्या केल्या आहेत. बैठकीमध्ये गैरहजर असलेल्या आप आणि द्रमुकच्या नेत्यांनीही या पत्रावर सह्या केल्या आहेत.

आप आणि द्रमुकच्या नेत्यांच्या सह्यांमध्ये इंडिया आघाडी पुन्हा एकजुट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पत्राबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत २३ पक्षांच्या नेत्यांसह एका अपक्ष खासदाराची सही असल्याचा उल्लेख केला आहे. त्यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी द्रमुक आणि आपच्या नेत्यांनीही सही केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे इंडिया आघाडीत फूट पडल्याचा भाजपचा दावा फोल ठरला आहे.

काय आहे पत्रात?

इंडिया आघाडीच्या बैठकीत सरन्यायाधीशांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रामुख्याने एसआयआर आणि निवडणुकांशी संबंधित मुद्द्यांकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहिले जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी २३ पक्षांच्या नेत्यांच्या सह्यांचे पत्र पाठविण्यात आले.

दरम्यान, आप आणि द्रमुकने काँग्रेसच्या भूमिकेवर आक्षेप घेत बैठकीला जाणे टाळले होते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने द्रमुकमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर आपनेही याच मुद्यावर काँग्रेसशी नाते तोडल्याचे म्हटले होते. जिथे काँग्रेस असेल तिथे आपले नेते उपस्थित राहणार नाहीत, असे या पक्षांनी जाहीर केेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT