New Delhi : लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीनंतर आघाडीची एकही बैठक झालेली नाही. यावरून काँग्रेस वगळता आघाडीतील सर्वच नेत्यांकडून आता त्यावरून निशाणा साधला जात आहे. तर दिल्लीत काँग्रेस विरुध्द इतर पक्ष अशी स्थिती आहे. आता एका बड्या नेत्याने आघाडीला झटका दिला आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जणू मोदी सरकारसमोर गुडघे टेकले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारसोबत जुळवून घेण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. संवाद आणि सहकार्याची गरज असून आम्हाला दिल्लीसोबत वाद घालायचा नाही. ज्यांना लढायचे आहे त्यांनी लढावे, असे विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.
अब्दुल्लांचे पुत्र व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही काँग्रेसला टार्गेट केले आहे. गुरूवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले होते की, इंडिया आघाडीचे नेतृत्व किंवा अजेंडा याविषयी काहीच स्पष्टता नाही. विरोधी आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठ स्थापन केली असेल तर ती आता भंग करावी, असे थेट विधान ओमर अब्दुल्ला यांनी केल्याने काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे.
दिल्ली निवडणुकीशी आमचा काही संबंध नाही. पण आप, काँग्रेस आणि इतर पक्षांनी भाजपशी मुकाबला कसा करायचा, हे ठरवायला हवे. इंडिया आघाडीसाठी कोणताही निश्चित कालावधी नव्हता, असे वाटते. पण दुर्दैवाने आघाडीची कसलीही बैठक आयोजित करण्यात आली नाही. आघाडीच्या अस्तित्वाबाबत कोणतीही स्पष्टता नाही, असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.
दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आपला तृणमूल काँग्रेस, शिवसेना यूबीटी, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल या आघाडीतील पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर डावे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. त्यामुळे दिल्लीत काँग्रेससोबत एकही मित्रपक्ष नाही. दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.