PM Modi Podcast Video: पहिल्याच पॉडकास्टमध्ये मोदी म्हणाले, चुका माझ्याकडूनही होतात, मी काही देव नाही...,"

PM Modi Nikhil Kamath Podcast: हा एपिसोड कधी प्रदर्शित होईल, याबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निखिल कामथ यांनी याचा ट्रेलर इंटरनेट मीडिया यावरुन शेअर केला आहे.
PM Modi Podcast Video
PM Modi Podcast VideoSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Nikhil Kamath Podcast: निखिल कामथ यांच्या 'पीपल बाई डब्ल्यूटीएफ'या पॉडकास्टचे पुढील अतिथी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. निखिल कामथ यांनी या एपिसोडची माहिती देण्यासाठी सोशल मीडियावर दोन मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे, हा एपिसोड प्रेक्षकांपर्यंत कसा जाईल, हे मला माहित नाही. तुमच्यासमोर मला भीती वाटत आहे, असे मोदी म्हणाले. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जनता' असे शीर्षक या एपिसोडला देण्यात आले आहे.

या एपिसोडचा ट्रेलर मोदी यांनी शेअर केला आहे 'हा एपिसोड करताना मला आनंद झाला. असाच आनंद तुम्हीही पाहताना घ्या,' असे सांगत मोदींनी निखिल कामथ यांच्या व्हिडिओ शेअर केला आहे. हा एपिसोड कधी प्रदर्शित होईल, याबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. निखिल कामथ यांनी हा ट्रेलर इंटरनेट मीडिया यावरुन शेअर केला आहे.

PM Modi Podcast Video
Delhi Assembly Election 2025: ममतादीदी, अखिलेश, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला एकटं पाडलं; दिल्लीत काँग्रेस Vs इंडिया आघाडी

राजकारण आणि उद्योगविश्व यातील संबध कसे असावे, याबाबतच्या माहितीसाठी हा पॉडकास्ट असल्याचे कामथ यांनी मोदींना सांगितले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरु असलेल्या युद्धाबाबत कामथ यांनी मोदींना प्रश्न विचारला आहे.याबाबत मोदींना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जगात शांतता नांदावी, अशी आपली भूमिका असल्याचे मोदींनी सांगितले.

PM Modi Podcast Video
Walmik Karad : काय सांगता? 'या' सरकारी योजनेचं महत्त्वाचं पद वाल्मिक कराडकडे...; 14 गुन्हे दाखल असतानाही मुंडेंनी....

युवक राजकारणाकडे कसे पाहतात, याबाबत कामथ यांनी मोदींना सांगितले. युवकांनी राजकारणात यायचे असले तर त्यांच्याकडे काय गुण आवश्यक आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मोदी म्हणाले, "राजकारणात नेहमीत चांगल्या लोकांना मिशन घेऊन येणे गरजेचे आहे, चुका सगळ्यांकडून होतात, माझ्याकडूनही चुका होतात, मी काही देवता नाही,"

मोदी पॉडकास्टमध्ये म्हणाले...

  • तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे

  • मी पण माणूस आहे, देव नाही, चुका माझ्याकडूनही होतात.

  • पहिल्या टर्ममध्ये लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि मीही दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो.'

  • युद्धाबाबत आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही (भारत) तटस्थ नाही, मी शांततेच्या बाजूने आहे.

  • चांगली माणसे राजकारणात आली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com