Republic Day : प्रजासत्ताक दिनासाठी परदेशी पाहुणे ठरले, पण पाकिस्तानमुळे पेच; काय आहे कनेक्शन?

India Republic Day 2025 Guest : प्रजासत्ताक दिनासाठी भारताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियंतो यांना आमंत्रित केले आहे.
India Republic Day
India Republic DaySarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या सोहळ्यासाठी दरवर्षी विविध देशांच्या प्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षीच्या पाहुण्यांची यादीही निश्चित झाली आहे. बहुतेकांना आमंत्रणं गेली आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियंतो हे यंदा प्रमुख पाहुणे असतील. मात्र, याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामागे पाकिस्तान कनेक्शन असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रपती सुबियंतो यांच्यामुळे पेच निर्माण झाला आहे. केंद्र सरकारकडून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतरच अधिकृत घोषणा केली जाईल. हा पेच पाकिस्तानमुळे निर्माण झाला आहे. सुबियंतो हे भारतात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार असले तरी तिथून ते थेट पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारला हेच नको आहे.

India Republic Day
PM Modi Podcast Video: पहिल्याच पॉडकास्टमध्ये मोदी म्हणाले, चुका माझ्याकडूनही होतात, मी काही देव नाही...,"

भारताच्या दौऱ्यासोबत पाकिस्तानचा दौरा असून नये, यासाठी भारत प्रयत्नशील आहे, असे वृत्त ‘न्यूज 18’ने दिले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती 26 जानेवारीला तीन दिवसांच्या पाकिस्तान दौऱ्यावर येत असल्याचे वृत्त पाकिस्तानातील मीडियाने दिले आहे. भारताचे पाकिस्तानशी सध्याचे संबंध खूप ताणले गेलेले आहेत. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारचे कनेक्शन केंद्र सरकारला नको आहे.

भारताकडून सुबियंतो यांच्या दौऱ्यात बदल करण्याबाबत प्रयत्न केले जात आहेत. ते भारतातून थेट पाकिस्तानला गेले तर चुकीचा संदेश जाऊ शकतो. भारत आणि इंडोनेशियामध्ये सर्वच पातळीवर चांगले राजकीय संबंध आहेत. औद्योगिक देवाण-घेवाणही मोठ्या प्रमाणात होत असते. तर दुसरीकडे इंडोनेशिया आणि पाकिस्तानचे राजकीय आणि आर्थिक संबंधही वाढू लागले आहेत.

India Republic Day
Delhi Assembly Election 2025: ममतादीदी, अखिलेश, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला एकटं पाडलं; दिल्लीत काँग्रेस Vs इंडिया आघाडी

सहा वर्षांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती विडोडो यांना 2018 मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यानंतर भारतातून ते थेट पाकिस्तानला गेले होते. आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com