Trinamool Congress and Congress leaders plans to drafted an impeachment notice against Chief Election Commissioner Gyanesh Kumar 
देश

CEC Gyanesh Kumar : मोठी बातमी : विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी हालचाली; ज्ञानेशकुमारांविरोधात 'महाभियोगाची' तयारी सुरु

CEC Gyanesh Kumar : 'इंडिया' आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी केली आहे. मतदारयादीतील नाव वगळणीच्या (SIR) मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस आक्रमक झाले आहेत.

Hrishikesh Nalagune

chief election commissioner of India : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर ‘इंडिया’ आघाडीने आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाची चाचपणी सुरू केली आहे. आयोगाच्या मतदारयादी फेरपडताळणी मोहिमेविरुद्ध (एसआयआर) आक्रमक तृणमूल काँग्रेस यासाठी विशेष आग्रही असून, प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनेही यासाठी अनुकूलता दर्शविल्याचे समजते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने ‘एसआयआर’ प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविला आहे. ‘एसआयआर’मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करताना तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर सत्ताधारी भाजपच्या हातातील बाहुले असल्याचीही टीका केली होती.

दरम्यान, बिहारनंतर पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ज्या राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविण्यात आली तिथे काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुकसह अन्य विरोधी पक्षांनी ‘एसआयआर’रला विरोध दर्शविला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी विरोधी पक्षांनी चालविली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच असते. दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताने प्रस्ताव मंजूर झाल्यास आयुक्तांना पदावरून हटवता येते. मात्र, विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने हा प्रस्ताव दबाव आणण्याचा डाव असल्याची चर्चा आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, अध्यक्षांकडून सरकारला झुकते माप दिले जात असल्याचे आरोप विरोधकांनी केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. अध्यक्षांनी ही नोटीस स्वीकारली आहे. आता या ठरावावर चर्चा होऊन मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चर्चेसाठी जवळपास 10 तासांचा कालवधी ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT