Minister Affairs: राजकारणात मोठी खळबळ; पत्नीचे मंत्र्यावर गंभीर आरोप; म्हणाल्या,'मी माझ्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत...'

Bedroom Scandal Wife Claims : मंत्री व अभिनेता असलेल्या नेत्यावर विवाहबाह्य संबंध आणि पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. पत्नी बिंदू मेनन यांनी पती के बी गणेशकुमार यांना दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर आपल्याकडं यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे असल्याचाही दावा केला आहे.
KB-Ganeshkumar-.jpg
KB-Ganeshkumar-.jpgSarkarnama
Published on
Updated on

Keral News: केरळच्या राजकारणातून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे. राज्याचे परिवहन मंत्री व अभिनेता केबी गणेश कुमार यांच्यावर त्यांच्याच पत्नीनं गंभीर आरोप केल्यानं केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मंत्री व अभिनेता असलेल्या के बी गणेशकुमार यांच्यावर विवाहबाह्य संबंध आणि पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आले आहेत. पत्नी बिंदू मेनन यांनी पती के बी गणेशकुमार यांना दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर आपल्याकडं यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे असल्याचाही दावा केला आहे. यावर खळबळजनक खुलासा करताना केबी गणेशकुमार यांनी आपले 5000 महिलांशी संबंध असल्याचं विधान केलं आहे.

मंत्री केबी गणेश कुमार यांनी या संपूर्ण प्रकरणावर दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यचकीत करणारी ठरली आहे.त्यांनी हे आरोप फेटाळून लावले नाहीत, पण त्याचशिवाय त्यांनी माझे 5000 महिलांशी संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. याचबरोबर त्यांनी आपले हे माझे खासगी आयुष्य असून त्यात कोणालाही दखल देण्याचा अधिकार नसल्याचं रोखठोक विधान केलं आहे.

याचदरम्यान, मंत्री केबी गणेशकुमार यांनी निवडणुका जवळ आल्यावर असे सनसनाटी आरोप केले जातात. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाचा राजकारणाशी काय संबंध आहे? असा संतप्त सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच विरोधक आपली कामं आणि प्रामाणिकपणावर शंका उपस्थित करु शकत नसल्यामुळेच वैयक्तिक गोष्टी पुढे आणल्या जात आहेत. पण प्रेम ही असामान्य गोष्ट असून जीवनात अनेक प्रकारचे नातेसंबंध असल्याचाही दावा केला आहे.

KB-Ganeshkumar-.jpg
BMC Ward Committee: 25 वर्षांची सत्ता गमावल्यानंतर उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेत दुसरा मोठा धक्का,प्रभाग समितीचं अध्यक्षपद गमावलं

एका स्थानिक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केबी गणेशकुमार यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनी हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.यामुळे केरळचं राजकारण तापलं आहे.याचवेळी केरळ काँग्रेस केरळ विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष यदु कृष्णन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरूनही नवा वाद पेटला आहे.

तसेच के बी गणेशकुमार यांनी यावेळी पत्नी बिंदू मेनन यांच्यासह केरळ काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष यदु कृष्णन यांनी केलेले पोस्टद्वारे केलेले हे सर्व आरोप आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेले राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे.तसेच 2021 पेक्षाही मोठ्या फरकानं निवडून येणार असल्याचा असा विश्वासही व्यक्त केला आहे.

KB-Ganeshkumar-.jpg
Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांनी विधानसभेतच सरकारचे कान टोचले : 'मी 37 वर्षे सभागृहात, पण सध्या ते होत नाही...’

पत्नी बिंदू मेनन यांनी केबी गणेशकुमार यांच्यावर गंभीर आरोप करताना यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी पतीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले असल्याचा दावा केला आहे. तसेच जेव्हा त्यांना संशय आला तेव्हा बिंदू यांनी मोबाईल फोनवर सर्व परिस्थितीचे काही पुरावे रेकॉर्ड केले. हे पुरावे त्यांच्या दाव्यांना सिद्ध करू शकतात.

तसेच ज्यावेळी बिंदू मेनन यांनी ही घटना कोल्लम जिल्ह्यातील वलाकोम येथील आपल्या घरात घडल्याचा दावा केला आहे. यात त्यांनी म्हणाल्या की, मी माझ्या पतीला अशा स्थितीत पाहिले ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्या फोनमध्ये याचे सर्व पुरावे आहेत. हे सर्व सांगताना माझ्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना आहे, तरीही आता मला कशाचीही पर्वा नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या कौटुंबिक वादानं केरळच्या राजकारण हादरलं आहे.

KB-Ganeshkumar-.jpg
Ambadas Danve News: अंबादास दानवेंनी भाजप सभापतीपदाच्या उमेदवाराची धरली गचांडी! भाजपाकडून सदस्य पळवा पळवी...

यावेळी बिंदू मेनन यांनी केवळ पतीवरच नव्हे,तर त्यांच्या कर्मचाऱ्यांवरही आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, मंत्री महोदयांचा ड्रायव्हर आणि इतर कर्मचारी देखील या सर्व प्रकारात सामील असून. जेव्हा मी हे सर्व पाहिले तेव्हा कर्मचाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला आणि माझ्या फोनमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अखेर कौटुंबिक सदस्य आणि भाजप नगरसेवक आर श्रीलेखा यांच्या सल्ल्यानंतर त्यांनी पोलीस हेल्पलाइन 112 वर संपर्क साधून मदत मागितली. पण ही घटना अत्यंत तणावपूर्ण असल्याचंही बिंदू मेनन यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे केबी गणेश कुमार हे केरळमधील पठानापुरम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी तब्बल 5 वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली असून जिंकलीही आहे.त्यांनी अभिनेते म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजवली आहे. केरळ काँग्रेसचे दिवंगत नेते के बालकृष्ण पिल्लई यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी के बी गणेशकुमार यांनी आत्तापर्यंत एकूण तीनदा मंत्रि‍पदं मिळवलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com