India Alliance  Google
देश

India Alliance : 'इंडिया' आघाडीची उद्याची बैठक लांबणीवर, काय आहे कारण?

Sachin Fulpagare

India Alliance Latest News : विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. अशातच पश्चिम बंगाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या बैठकीला येणार नकार दिला होता. यामुळे 6 डिसेंबरला म्हणजे उद्या 'इंडिया' आघाडीची प्रस्ताविक बैठक होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार हे बैठकीला येणार नव्हते. पण त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी ते बैठकीला पाठवणार होते. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्यासर इतर काही पक्षाचे नेतेही येणार नसल्यामुळे 'इंडिया' आघाडीची उद्याची प्रस्ताविक बैठक रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

विरोधी पक्षांच्या आघाडीतील काही घटक पक्षांचे प्रमुख नेते बैठकीसाठी उपलब्ध नसल्यामुळे 'इंडिया' आघाडीची बुधवारी होणारी प्रस्तावित बैठक रद्द स्थगित करण्यात आली आहे. पण आघाडीची अनौपचारिक समन्वय बैठक होईल. त्यात पक्षांचे संसदीय पक्षाचे नेते सहभागी होतील, असे काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बैठकीत सहभागी न होणारे नितीश कुमार आणि अखिलेश यादव हे दुसरे आणि तिसरे हायप्रोफाईल नेते आहेत. त्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी बैठकीत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. काँग्रेस सोबत ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे बैठकीबाबत माहिती नसल्याचे ममता बॅनर्जींनी म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही उद्या दिल्लीत होणार होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानही ही बैठक आयोजित करण्यात आली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

चक्रीवादळामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हे बैठकीला येणार नव्हते. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या वैवाहिक कार्यक्रमात आहेत. यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. मुंबई, पटणा आणि बेंगळुरूत या बैठका झाल्या आहेत. मुंबईतील बैठकीत पुढील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवण्यासाठी 14 सदस्यांची समन्वय समिती नेमण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT