Mallikarjun Kharge, Election Commission Sarkarnama
देश

Loksabha Election Result : 'EVMची मोजणी संपण्याआधी..' ; I.N.D.I.A आघाडीची निवडणूक आयोगाकडे मागणी!

I.N.D.I.A Alliance Meeting with Election Commission : वरिष्ठ अधिवक्ता आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली.

Mayur Ratnaparkhe

I.N.D.I.A Alliance and Election Commission Loksabha Result लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्प्यांमधील मतदान 1 जून रोजी संपले असून, एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. त्यामुळे आता सर्वांना 4 जून रोजी लागणाऱ्या प्रत्यक्ष निकालाची प्रतीक्षा आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने रविवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली.

वरिष्ठ अधिवक्ता आणि काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी(Abhishek Manu Singhvi) यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी रविवारी निवडणूक आयोगाशी मतमजोणी संदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाची भेट घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की, EVMची मतमोजणी संपण्याआधी पोस्टल बॅलेटच्या मतांची मोजणीही पूर्ण केली पाहीजे. कारण, पोस्टल बॅलेची प्रक्रिया निवडणुकीच्या निकालास एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ शकते.

काँग्रेस(Congress) नेत्यांनी म्हटले की, कोणत्याही निवडणुकीत पोस्टल बॅलेट निर्णायक भूमिका बजावतात. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोस्टल बॅलेटची मोजीण आधी केली जाईल. 2019मध्ये स्पष्टपणे म्हटले की आधी पोस्टल बॅलेटची आणि नंतर EVM मोजणी सुरू होईल. परंतु EVMची मोजणी संपू शकत नाही, जोपर्यंत पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होत नाही. निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वांद्वारे नियम बदलला आहे, ज्यानुसार 2019ची मार्गदर्शक तत्वे काढली आहेत. ज्यानुसार ईव्हीएमच्या अंतिम मोजणीच्या आधी पोस्टल बॅलेटची मोजणी संपवणे अनिवार्य आहे.

देशात लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान काल (1 मे) संपले आणि त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारीही समोर आली. यानुसार देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार असल्याचे दिसत आहे. कालच्या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इंडिया आघाडीनेही महत्त्वपूर्ण बैठक घेतली. एक्झिट पोलची आकडेवारी समोर येण्याआधी झालेल्या या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीला या लोकसभा निवडणुकीत 295 जागा मिळतील याबाबत भाष्य केलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT