Kyriakos Mitsotakis, Narendra Modi Sarkarnama
देश

India and Greece : पंतप्रधान मोदींच्या मैत्रीचा हात ग्रीसपर्यंत; पाकिस्तान, चीनचा पुन्हा जळफळाट

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News :

व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा देश असलेला ग्रीस हा देश आता भारताशी जोडला गेला आहे. भारताचे अरब देश, युरोपातील देश, अमेरिका खंडातील देशांशी मैत्रिपूर्ण संबंध विकसित होत असताना आता ग्रीससोबत जवळीक होत आहे. भारतासाठी ही मोठी घटना असला तरी भारताचे पारंपरिक शत्रू पाकिस्तान आणि चीनचा जळफळाट आणखी वाढणार आहे, एवढे मात्र नक्की!

ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस (Greek Prime Minister Kyriakos Mitsotakis) यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) त्यांचं स्वागत केलं. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. भारताचे जगातील अनेक देशांची संबंध दृढ होत असताना आता ग्रीससोबत मैत्रीचे सूत जुळल्यामुळे व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे.

संरक्षण आणि दहशतवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्यात प्रामुख्याने द्विपक्षीय व्यापार तसेच संरक्षण उत्पादन (Defence) आणि दहशतवादाच्या (Terrorism) मुद्द्यावर गहन चर्चा झाली. दोन्ही देशांसाठी दहशतवाद हा चिंतेचा विषय असून त्याविरोधात एकमेकांना पुरक भूमिका घेण्यावर एकमत झालं.

16 वर्षांनंतर भारतात

ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस आणि पंतप्रधान मोदी यांची यापूर्वी 27 सप्टेंबर 2019 रोजी रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत (United Nations General Assembly) भेट झाली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध विकसित करण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर आता मित्सोटाकिस भारत दौऱ्यावर आले आहे. तब्बल 16 वर्षांनंतर त्यांचा भारत दौरा होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही देशांमध्ये आता अनेक क्षेत्रांत भागीदारी (Strategic Partnership) होणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य करण्यावर दोन्ही पंतप्रधानांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाचा मुद्दा गंभीर आहे. म्हणूनच दहशतवादाचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांचे संबंध कसे मजबूत होतील, यावर भर देण्यात आला.

दरम्यान, संरक्षण क्षेत्राबाबत भारत आणि ग्रीस (India and Greece) यांच्यातील वाढते सहकार्य हे दोन्ही देशांमधील परस्पर विश्वासाचे उत्तम प्रतिक आहे. आम्ही भारत आणि ग्रीसमधील संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरणार आहे. संवाद आणि मुत्सद्देगिरीने सर्व वाद आणि तणाव सोडवला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ग्रीसच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT