Lok Sabha Election 2024 : अखेर प्रियांका गांधींनी बाजी पलटवली; अखिलेश यांनीच दिले मोठे संकेत...

India Alliance Seat Sharing : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमधील जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
Akhilesh Yadav, Priyanka Gandhi
Akhilesh Yadav, Priyanka GandhiSarkarnama

Uttar Pradesh news : मागील काही दिवसांपासून जागावाटपाच्या चर्चेत अडकलेली समाजवादी पार्टी व काँग्रेसमधील बोलणी अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊल मागे घेत मतदारसंघांवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते. याबाबत सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ‘अंत भला तो सब भला…’, असे म्हणत सूचक संकेत दिले आहेत. (Lok Sabha Election 2024)

अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी सोमवारी काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता. त्यांनी 17 जागांची ऑफर दिली होती. मात्र, त्यातील काही जागांवरून दोन्ही पक्षांमधील बोलणी पुढे जात नव्हती. त्यामुळे इंडिया आघाडीत (India Alliance) उत्तर प्रदेशातही फूट पडणार अशी जोरदार चर्चा होती. त्यावर आज अखिलेश यांनी पडदा टाकला आहे.

Akhilesh Yadav, Priyanka Gandhi
Mamata Banerjee News : ममतांच्या दोन खासदारांचे बंड; लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बसणार धक्का...

आज मीडियाशी बोलताना अखिलेश म्हणाले, आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होईल. लवकर सर्वकाही स्पष्ट होईल. इतर गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. थोड्या वेळात जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. अंत भला तो सब भला, असे सांगत त्यांनी आघाडीचे संकेत दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसला 17 जागा

काँग्रेसला (Congress) अमेठी, रायबरेली, प्रयागराज, वाराणसी, महाराजगंज, देवरिया, बांसगांव, सीतापूर, अमरोहा, बुलंदशहर, गाजियाबाद, कानपूर, झांसी, बाराबंकी, फतेहपूर, सिकरी, सहारनपूर आणि मथुरा या जागा मिळणार आहेत. मुरादाबाद, बलिया आणि बिजनोर या तीन जागांवर पेच निर्माण झाला होता. त्यावर आता तोडगा निघाला आहे.

प्रियांका गांधींची यशस्वी मध्यस्थी

प्रियांका गांधी यांनी आघाडीसाठी चर्चा सुरू केली होती. राहुल गांधींनी नंतर अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस मुरादाबादच्या जागेवर अडून बसले होते. अखेर चर्चेनंतर काँग्रेसने मुरादाबादचा हट्ट सोडून सीतापूर, श्रावस्ती आणि वाराणसीची मागणी केली. त्यासाठी प्रियांका यांनी अखिलेश यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यानंतर दोन्ही पक्षांमधील बोलणी ट्रॅकवर आल्याचे समजते. आता सपाकडून वाराणसीची जागा काँग्रेसला सोडली जाणार असल्याची चर्चा आहे. सपाने यापूर्वीच या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे.

R

Akhilesh Yadav, Priyanka Gandhi
Bihar Political News : विधानसभा उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; बिहारमध्ये पुन्हा उलथापालथ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com