Indian government blocks access to Pakistani Defence Minister Khawaja Asif’s X (formerly Twitter) account after nuclear threat remarks  Sarkarnama
देश

Khawaja Asif : 'अब आया ऊँट पहाड़ के नीचे' ; अणुहल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यास भारताने आणलं वठणीवर!

Indian Government Action against Khawaja Asif : आता म्हणताय आम्हाला भारतासोबत युद्ध नकोय; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?

Mayur Ratnaparkhe

Khawaja Asif's X Account Banned in India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांना पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे. भारताने या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने भारताकडून पाकिस्तानविरोधात विविध कडक पावलं उचलली जात आहेत. त्यात आता भारताने अणवस्त्र हल्ल्याची बाता मारणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनाही चांगलाच झटका दिला आहे. कारण, भारताने ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बॅन केलं आहे.

मागील काही दिवसांपासून आसिफ हे त्यांच्या एक्स अकाउंटवर विविध पोस्ट करून, भारताला कायम डिवचण्याचा प्रय़त्न करत होते. शिवाय, एका मुलाखतीतही त्यांनी अणवस्त्राच्या वापराबाबत वक्तव्य केलं होतं. खरंतर भारताने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तान आणि पाकिस्तानी सैन्य चांगलंच धास्तावलेलं आहे. मात्र तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत.

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी याआधी एका मुलाखतीत बोलून दाखवलं होतं की, भारत कधीही हल्ला करू शकतो, आम्ही आमचे सैन्य सतर्कर ठेवले आहे. शिवाय, यावेळी त्यांनी असा इशाराही दिला होता की, जर पाकिस्तानच्या अस्तित्वास थेट धोका निर्माण झाला तर आम्ही अणवस्त्राचाही वापर करू शकतो. आसिफ यांच्या विषारी विधानांमुळे भारताने त्यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना झटका दिला आहे.

या आधी भारताने पाकिस्तानला विविध मार्गाने झटके दिले आहेत. ज्यामध्ये सिंधू जल करारास स्थगिती, भारतामधील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवणे, भारतामधील पाकिस्तानी दूतावासातील अधिकाऱ्यांना परत जाण्यास सांगणे आणि पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी यांचा समावेश आहे.

भारताने घेतलेल्या या कडक भूमिकेनंतर आधी अणवस्त्राची भाषा करणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा सूर काहीसा बदलला असून, आम्हाला भारतासोबत युद्ध नको आहे असंही आता ते बोलत असल्याचं समोर येत आहे. मात्र भारत आता कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेच दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT