Mamata Banerjee upset over seat allocation :  Sarkarnama
देश

Mamata Banerjee On INDIA : 'इंडिया' आघाडीत बिघाडी ? जागावाटपावरून ममता बॅनर्जी नाराज ?

Mamata Banerjee upset over seat allocation : ममतांच्या प्रस्तावाला इंडिया आघाडीचा खो ?

Chetan Zadpe

Delhi News : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'इंडिया आघाडी'च्या (India Alliance) बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) लवकर जाहीरनामा तयार करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. जागावाटपासह इतर काही मुद्द्यांवर आघाडीच्या मंद गतीने चालेलेल्या प्रक्रियेवर त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. (Latest Marathi News)

ममता बॅनर्जी आणि त्यांचे सहकारी अभिषेक बॅनर्जी यांनी आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेलाही उपस्थिती लावली नव्हती. तेव्हापासून विरोधी आघाडीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. दोघेही पूर्वनियोजित कार्यक्रम होता, म्हणून उपस्थित राहिले नाहीत, असे सांगितले असले तरी, आघाडीत धुसफूस सुरू आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, आघाडीच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एक जाहीरनामा लवकर तयार करण्याचे सुचविले जेणेकरुन ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल, परंतु त्यांच्या प्रस्तावाला इतर पक्षांकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. तसेच, जागावाटपावर लवकर चर्चा व्हावी, त्यामुळे निवडणुकांची तयारीला पुरेसा वेळ मिळेल अशीही टिएमसीची भूमिका व्यक्त केली होती.

जागा वाटपावर बोलणे आवश्यक आहे -

आघाडीला विविध राज्यांमधील लोकसभेच्या जागावाटपाकडे लक्ष द्यावे लागेल. कारण 2024 च्या निवडणुकीत आघाडीला जागावाटपाच्या या एका मुद्द्याभोवती तोडगा काढावा लागणार आहे पश्चिम बंगाल, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीसह, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाव तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT