Pakistan earthquake adds crisis Sarkarnama
देश

Earthquake in Pakistan : पाकवर दुहेरी संकट ओढावलं; भारताकडून हवाई हल्ले सुरू असतानाच पाकिस्तान भूकंपाने हादरलं

India Pakistan conflict : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेला पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकचे ड्रोन भारत हवेतल्या हवेतच उद्ध्वस्त करत आहे. एकीकडे भारत पाकिस्तानवर हवेतून हल्ले करत असतानाच आता पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलं आहे.

Jagdish Patil

Earthquake in Pakistan : सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली असून सीमा रेषेवर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात लष्करी कारवाई करत आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेला पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पाकचे ड्रोन भारत हवेतल्या हवेतच उद्ध्वस्त करत आहे. एकीकडे भारत पाकिस्तानवर हवेतून हल्ले करत असतानाच आता पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलं आहे.

कारण मध्यरात्री 1.44 मिनिटांनी पाकिस्तान भूकंपाने हादरलं आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करायला सुरूवात केली आहे.

त्यामुळे भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागून हे हल्ले करत असतानाच भूंकपामुळे पाकिस्तानमध्ये भितीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये झालेला भूकंप 4.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिली आहे. तर या भूकंपात पाकचं नेमकं काय नुकसान झालं याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT