
Pakistani drone attack : पाकिस्तान लष्कराने नागरी विमानाच्या आड, शुक्रवारी रात्री ड्रोनद्वारे पुन्हा हल्ले सुरू केले. पंजाबमधील अमृतसर शहरावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला.
भारतीय लष्करानं या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. परंतु पुन्हा ड्रोन हल्ला होऊ शकतो, हे लक्षात घेऊन अमृतसर शहरात ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. अमृतसर शहरात पवित्र सुवर्ण मंदिर आहे. पाकिस्ताने अशा धार्मिक स्थळांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या हल्ल्याच्या प्रयत्नातून पुन्हा एकदा पुढं आलं आहे.
अमृतसर अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे. तिथं ऐतिहासिक सुवर्ण मंदिर आहे. या शहरात इतरही धार्मिक स्थळ आहेत. यातच पाकिस्तानने तिथं ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय (India) लष्करानं सतर्कता दाखवत हा ड्रोन हल्ला उधळून लावला. अमृतसर शहराती लष्करासह स्थानिक पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तसेच सुवर्ण मंदिरासह संपूर्ण शहरात ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे.
पाकिस्तानने थेट अमृतसर शहर टार्गेट केल्याने भारतात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. अशा परिस्थिती देखील भारतीय लष्कराकडून संयम दाखवला जात आहे. लष्कर आणि पोलिसांकडून अमृतसर (Punjab) शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ब्लॅकआऊटमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केलं आहे.
पाकिस्तानने शुक्रवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर पुन्हा ड्रोन हल्ले तीव्र केले. पठाणकोट इथं भारतीय लष्करानं पाकिस्तानने पाठवलेले चार ड्रोन पाडले. याशिवाय जम्मू-काश्मीर सीमालगत भागात गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात स्थानिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. भारताने संपूर्ण सीमालगत भागात ब्लॅक आऊट केला असून, पुढील आदेशापर्यंत शाळा, महाविद्यालयांना आणि हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक झाली. सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू, श्रीनगर, लेह, अमृतसर, चंदीगड, जोधपूरसह 28 विमानतळ बंद केले आहेत. ही विमानतळे 15 मे रोजी पर्यंत बंद राहतील. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइसजेटने या शहरांमधून उड्डाणे रद्द केली आहेत. पाकिस्तानच्या संभाव्य हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि लष्करी तयारी मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि इतर केंद्रीय दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.