Madhya Pradesh Minister Vijay Shah may resign following backlash over his statement on Colonel Sophia Qureshi amid the India-Pakistan conflict.  Sarkarnama
देश

India Vs Pakistan : भारत-पाक संघर्षानंतर मंत्रिपदाचा पहिला राजीनामा मध्य प्रदेशातून? 8 दिवसांत फैसला

Colonel Sophia Qureshi at the Center of Political Storm : मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते.

Rajanand More

Impact of India-Pakistan Conflict on Domestic Politics : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचे धाबे दणाणले. या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांचे भारतभर कौतुक झाले. भारतीय लष्कराच्या शौर्याला अवघ्या देशाने सलाम केला. पण काही राजकीय नेत्यांनी वादग्रस्त विधाने करत देशवासियांच्या रोषही ओढवून घेतला.

मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. सुप्रीम कोर्टाने त्याची दखल घेत त्यांच्यावर चांगलेच आसूड ओढले. त्यांचा माफीनामाही कोर्टाने स्वीकारला नाही. उलट त्यांच्या विधानाच्या चौकशीसाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता शाह यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

भारत आणि पाकमधील संघर्षानंतर शाह यांचा देशातील मंत्रिपदाचा पहिला राजीनामा ठरू शकतो. पुढील आठ दिवसांनी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने एसआयटीला 28 मेला आपला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. एसआयटी चौकशीमध्ये शाह दोषी आढळल्यास मध्य प्रदेश सरकारमधून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ जाईल, अशी दाट शक्यता आहे.

काँग्रेसने शाह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. पक्षाचे नेते भूपेंद्र गुप्ता यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात महिला सक्षम होत्या. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष मंत्रिमंडळ बैठकीपासून तरी किमान लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांना दूर ठेवायला हवे.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनीही टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरच भाजप आपल्या नेत्याचा राजीनामा घेणार का?, असा सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत भाजपने कोर्टाकडे बोट दाखवले आहे. कोर्ट जो आदेश देईल, त्याला सरकार बांधील असेल. याचा अर्थ विजय शाह यांच्याबाबत एसआयटीचा अहवाल आल्यानंतर निर्णय होईल, असे भाजप नेते सांगत आहेत.   

दरम्यान, शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख दहशतवाद्यांची बहीण असा केला होता. मध्य प्रदेश हायकोर्टाने त्याची दखल घेत शाह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात शाह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत माफीनामा दाखल केला. पण कोर्टाने माफी न स्वीकारता थेट एसआयटी चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांना तोपर्यंत अटक न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT