
Impact on BJP vs Congress Political Narrative : भारत आणि पाकिस्तानातील संघर्ष थांबला असला तरी आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या एका विधानावरून भारताची किती विमाने आपण गमावली, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावरून आता भाजपने राहुल गांधीविषयी वादग्रस्त फोटो शेअर करत टीकास्त्र सोडले आहे.
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली आहे. त्यांनी याबाबतचा एक फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि राहुल यांचा अर्धा चेहरा असलेला फोटोही एक्सवर शेअर करत त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
मालवीय यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, हे आश्चर्यकारक नाही. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधानांचे अभिनंदन केले नाही. याउलट ते सतत आपण किती विमाने गमावली, हे विचारत आहेत. या प्रश्नाचे उत्तर डीजीएमओ यांनी आधीच दिले आहे. या संघर्षात पाकिस्तानची किती विमाने पाडली, हे जाणून घेण्याचा प्रयत्न राहुल यांनी एकदाही केला नाही.
राहुल गांधींना पुढे काय मिळणार? निशाण-ए-पाकिस्तान?, असा प्रश्न करत मालवीय यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ तळ उध्वस्त केली. त्यानंतरच्या दोन्ही देशांच्या संघर्षातही भारताने पाकला धूळ चारली. यापार्श्वभूमीवर जयशंकर यांच्या एका व्हिडीओचा आधार घेत राहुल यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती आधीच पाकिस्तानला दिली होती, असा दावा केला होता.
राहुल यांच्याकडून दोनवेळा एक्सवर पोस्ट करत याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांनी म्हटले होते की, परराष्ट्र मंत्री जयशंकर गप्प आहेत. त्यांची चुप्पी खूप काही सांगते. हे निंदनीय आहे. त्यामुळे पुन्हा विचारतोय की, पाकिस्तानला हल्लाची माहिती आधीच असल्याने आपण किती विमाने गमावली? ही केवळ चूक नव्हती. हा गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.