Subedar Major Pawan Kumar Jaryal Sarkarnama
देश

India vs Pakistan : पाकिस्तानच्या गोळीबारात सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल शहीद; ऑगस्ट महिन्यात होणार होते निवृत्त

Indian Army Retaliation : भारताच्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकचे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परातवून लावले. दोन्ही बाजूंनी झालेल्या लष्करी कारवाईत काही भारतीय जवान देखील शहीद झाले आहेत.

Jagdish Patil

Indian Army Retaliation : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून घेतला. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत भारताने पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडलं.

भारताच्या कारवाईनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकचे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परातवून लावले. दोन्ही बाजूंनी झालेल्या लष्करी कारवाईत काही भारतीय जवान देखील शहीद झाले आहेत.

यामध्ये 25 पंजाब रेजिमेंटचे सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल यांचा देखील समावेश आहे. सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल हे अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात लष्करातून निवृत्त होणार होते. मात्र, त्याआधीच त्यांना वीरमरण प्राप्त झालं.

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात ते शहीद झाले. महत्त्वाची बाब म्हणजे शहीद जरीयाल यांनी काही महिन्यांपूर्वीच सीमावर्ती शहराला त्यांची शेवटची पोस्टिंग म्हणून निवडले होते.

तर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर आपण मुलाशी फक्त एकदाच बोलल्याचं सुभेदार मेजर पवन कुमार जरीयाल यांचे वडील गराजसिंग जरीयाल यांनी सांगितलं. दरम्यान, शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

त्यामुळे पंजाबमधील अमृतसर, फिरोजपूर, बर्नाला, पठाणकोट अशा अनेक शहरांमध्ये काल रात्री ब्लॅकआउट लागू करण्यात आला होता. तर पाकिस्तानने कागाळी केल्यास त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर द्या असे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने लष्कराला दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT