Asaduddin Owaisi On Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, असुद्दीन ओवेसी म्हणाले, 'काही झाले तरी पहलगाम हल्ल्यातील...'

Asaduddin Owaisi India Pakistan Ceasefire : जेव्हा बाह्य आक्रमण होते तेव्हा मी सरकार आणि भारतीय लष्कराच्यासोबत उभा राहिलो आहे. हे समर्थन नेहमीच असणार आहे, असे ओवेसी म्हणाले.
Asaduddin Owaisi On Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, असुद्दीन ओवेसी म्हणाले, 'काही झाले तरी पहलगाम हल्ल्यातील...'
Sarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi News : भारत पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा शनिवारी सायंकाळी पाच वाजता करण्यात आली. तरी देखील पाकिस्ताने अवघ्या तीन तासांत पुन्हा ड्रोन हल्ले केले त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. शस्त्रसंधी झाल्यानंतर एमआयएम पक्षाचे प्रमुख, खासदार असुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त करत सरकारला चार प्रश्न विचारले.

ओवेसी म्हणाले, 'जोपर्यंत पाकिस्तान त्यांच्या भूमितून भारताविरोधात आंतकवादाचा वापर करत राहिल तो पर्यंत शांतता शक्य नाही.शस्त्रसंधी होवो अथवा न होवो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या आंतकवाद्यांचा पाठलाग सोडता कामा नये.'

Asaduddin Owaisi On Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, असुद्दीन ओवेसी म्हणाले, 'काही झाले तरी पहलगाम हल्ल्यातील...'
India Pakistan ceasefire violation : शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी तिन्ही सैन्यदलाला स्वातंत्र्य; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा (VIDEO)

जेव्हा बाह्य आक्रमण होते तेव्हा मी सरकार आणि भारतीय लष्कराच्यासोबत उभा राहिलो आहे. हे समर्थन नेहमीच असणार आहे. भारतीय सैनिकांच्या बहादुरीसाठी आणि त्यांच्या कौशल्यासाठी आभार व्यक्त करतो. आशा व्यक्त करतो की, शस्त्रसंधीमुळे सीमेक्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळाला असेल.

ओवेसी यांनी सरकारला विचारलेले प्रश्न

असुद्दीने ओवेसी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत तसेच सरकार यावर स्पष्टीकरण देईल असे देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

1.शस्त्रसंधीची घोषणा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करायला हवी होती. तिसऱ्या देशाच्या राष्ट्रपतीने ही घोषणा करायला नको होती. शिमला करारानुसार तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला विरोध करण्यात आला आहे. मग आपण तिसऱ्या देशाची मध्यस्थी का स्वीकारली?

2. आपण तिसऱ्या ठिकाणी चर्चा करण्यासाठी का तयार झालो आहोत? या चर्चांचा अजेंजा का होता? अमेरिका याची गॅरंटी देणार का की पाकिस्तान त्याच्या भूभागाचा वापर दहशतवाद्यांना करून देणार नाही.?

3. पाकिस्तानने भविष्यात आंतकवादी हल्ले थांबण्याचा उद्देश प्राप्त केला आहे का? आपले लक्ष्य ट्रंम्प यांच्या मध्यस्थीचे होते का?

4. आपल्याला पाकिस्तानला FATF च्या ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहिम चालू ठेवली पाहिजे.

Asaduddin Owaisi On Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, असुद्दीन ओवेसी म्हणाले, 'काही झाले तरी पहलगाम हल्ल्यातील...'
Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांचे मोठे विधान; म्हणाले ‘आघाडीच्या राजकारणामुळेच कॉंग्रेस पक्षाचे नुकसान’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com