India Pakistan warships collision Sarkarnama
देश

India vs Pakistan : धक्कादायक : अरबी समुद्रात टेन्शनचे वातावरण, भारत-पाकिस्तानच्या युध्दनौकांची धडक, दिल्लीतून लगेच राजदुतांना निरोप

Arabian Sea naval collision, Indian Navy Pakistan Navy, Pakistan naval vessel : घटनेनंतर भारताने तातडीने दिल्लीतील पाकिस्तानी राजदुतांना निरोप धाडत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Rajanand More

Indian warship update : पलहगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. त्यातच अरबी समुद्रात धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. उत्तर अरबी समुद्रात भारत आणि पाकिस्तानच्या युध्दनौकेची धडक झाली आहे.

दोन्ही देशांच्या युध्दनौकांच्या धडकेची घटना १५ सप्टेंबरला सायंकाळी घडली आहे. भारतीय युध्दनौका आंतरराष्ट्रीय सीमेवर नियमित निगरानी करत असताना समोरून वेगात आलेल्या पाकिस्तानी युध्दनौकेने धडक दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमध्ये भारतीय युध्दनौकेचे फारसे नुकसान झाले नसले तरी त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

समुद्रातील आंतरराष्ट्रीय नियंत्रण क्षेत्रात पाकिस्तानी युध्दनौके अचानक वेगाने भारतीय युध्दनौकेच्या दिशेने आली. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पाक युध्दनौका धोकादायक पध्दतीने भारतीय युध्दनौकेच्या जवळ येत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यानंतर पाकच्या नौकने भारतीय जहाजाला धडक दिली.

घटनेनंतर भारताने तातडीने दिल्लीतील पाकिस्तानी राजदुतांना निरोप धाडत कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानी युध्दनौकेची वागणूक ही १९९१ मधील भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या सैन्य सरावाबाबतच्या समझोत्याचे उल्लंघन होते, अशी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

भारताने इस्लामाबादमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे घटनेबाबत विरोध दर्शविण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT