Local body election 2026 : काँग्रेसपेक्षा 566 नगरसेवक अधिक, पण तरीही भाजपला मोठा धक्का; निवडणूक निकालाने वाढविले टेन्शन

Rajasthan civic election results, municipal election, BJP Congress : भाजपने अनेक नगरपालिकांमध्ये विजय मिळविला असला तरी हा विजय क्लीन स्वीप अजिबात नाही. या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांचा टक्का ४०.८ टक्के एवढा आहे.
BJP Congress
BJP CongressSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan civic election results : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांचा आकडा जवळपास ५ टक्क्यांनी वाढला आहे. कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसला छोबीपछाड करत भाजपने अपेक्षित आघाडी घेतली खरी मात्र मतांचा टक्का पक्षाला धक्का देणारा आहे. या निकालाने भाजप नेत्यांचे टेन्शन चांगलेच वाढविले आहे.

भाजपला स्थानिकच्या निवडणुकीत १० हजार २३५ वॉर्डपैकी ४ हजार १७९ तर काँग्रेसला ३ हजार ६१३ वॉर्डमध्ये विजय मिळाला आहे. मागील निवडणुकांच्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांमध्ये जवळपास पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या जागा तेवढ्यानेच कमी झाल्या आहेत. एकीकडे नगरसेवकांच्या संख्येत भाजपने काँग्रेसला मागे टाकले असले तरी मतांच्या टक्केवारीतील तफावत एक टक्काही नाही.

प्रामुख्याने शहरी भागातील भाजपचा मतांचा टक्का कमी झाल्याचे निकालावरून दिसते. राज्यात सत्ता असूनही पक्षाला शहरी मतदारांनी अपेक्षित मदत केली नाही. भरतपूर, पाली, बिकानेर, जोधपूर आणि अलवार या महापालिकांनी पक्षाला बहुमत मिळविता आलेले नाही. विशेष म्हणजे, या भागातील सर्व सात लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्‍यांचा या भागात दबदबा मानला जातो.

BJP Congress
Manoj Jarange Patil update : सिरीयस कंडिशन, सलाईन लावून प्रवास अशक्य! मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत खुद्द जिल्हा शल्य चिकित्सकांनीच दिली महत्वाची माहिती

भाजपने अनेक नगरपालिकांमध्ये विजय मिळविला असला तरी हा विजय क्लीन स्वीप अजिबात नाही. या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांचा टक्का ४०.८ टक्के एवढा आहे. त्या तुलनेत काँग्रेसची मते केवळ ०.९४ टक्क्यांनी कमी आहे. भाजपला १० पैकी केवळ जयपूर, कोटा, उदयपूर आणि भिलवाडा या चार महापालिकांमध्येच सत्ता काबीज करता आली आहे. तर काँग्रेसला केवळ बिकानेरमध्ये बहुमत मिळाले.

BJP Congress
Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश, केंद्राकडे धाव; तुमची कशी होतेय लूट? एकदा वाचाच...

राज्यात मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या पालीमध्ये काँग्रेसला २९ तर भाजपला २१ जागा मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे वर्चस्व असलेल्या झालवाडमध्येही भाजपला ताकद दाखविता आली नाही. या नगरपालिकेत काँग्रेसने ४५ पैकी २९ जागा जिंकल्या. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या पोखरण आणि जोधपूर भागातही पक्षाला मतदारांनी अपेक्षित साध दिली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com