INDIA Vs US
INDIA Vs US Sarkarnama
देश

US On Manipur Violence : मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन झाल्याचं म्हणाणाऱ्या अमेरिकेला भारतानं खडसावलं

Sunil Balasaheb Dhumal

New Delhi News : मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात मानवी हक्कांच्या उल्लंघन झाल्याचा ठपका अमेरिकेने आपल्या एका अहवालात ठेवला आहे. ते आरोप फेटाळत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला चांगलेच सुनावले आहे. अमेरिकेचा हा अहवाल पक्षपाती असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. India reply US for Human right report.

अमेरिकेचा US वार्षिक ‘ह्युमन राइट्स असेसमेंट रिपोर्ट’ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात देशातील मणिपूरमध्ये गत वर्षी झालेल्या वांशिक हिंसाचार, जम्मू काश्मिर संघर्षाच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच भारतभरात अल्पसंख्याक, पत्रकार आणि सरकारविरोधातील आवाज दाबला जात असल्याचेही नमूद केले आहे. या अहवालावर भारताने अमेरिकेला सडेतोड उत्तर दिले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, अमेरिकेने प्रसिद्ध केलेला अहवाल हा पक्षपाती आहे. त्यात कुठल्याही प्रकारची समज दिसून येत नाही, असा पलटवार केला आहे. भारत विविध समाजांना धार्मिक स्वातंत्र्य देतो, त्यांच्या मानवी हक्कांचा आदर करतो, याकडेही जयस्वाल यांनी अमेरिकेचे लक्ष वेधले. आपण जेव्हा मित्रराष्ट्राशी तेही लोकशाही मानणाऱ्या देशाबाबत विधाने करताना योग्य संतुलन राखण्याची समज दाखवली पाहिजे, असेही ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहवालाबाबत अमेरिकेशी चर्चा झाल्याचेही जयस्वाल यांनी सांगितले. चर्चेत वांशिकतेने प्रेरित हल्ले, द्वेषपूर्ण गुन्हे आणि बंदुकीच्या हिंसाचाराशी संबंधित समस्यांवर सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन मूल्यांकन करणे टाळले पाहिजे. भारत धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचा आदर करतो, असेही अमेरिकेला सांगितल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT