PM Narendra Modi on Terror Attack Sarkarnama
देश

India Counterstrike : मोदी-शाह 6 वर्षांपूर्वीचा प्लॅन पुन्हा प्रत्यक्षात आणणार? पहलगाममधील हल्ल्यानंतर लष्कर अलर्टवर

Brutality in Pahalgam: What Happened? : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने यापूर्वी केलेल्या कारवायांचा चर्चा आता होऊ लागली आहे.

Rajanand More

New Delhi News : काश्मीर व्हॅलीतील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्याने केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग सुन्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तिन्ही दलांचे प्रमुख, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बैठकांवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे भारत करारा जवाब देणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने यापूर्वी केलेल्या कारवायांचा चर्चा आता होऊ लागली आहे. 2016 मधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात 19 लष्करी जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानला करारा जवाब देत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केले होते. भारतीय लष्काराचे जवान थेट पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ जवानांनी उद्धवस्त केले होते.

उरी हल्ल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2019 मध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येते जवानांचे वाहन बॉम्बने उडवून दिले होते. पुलवामा हल्ल्यालाही भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केले होते. या दोन हल्ल्यानंतर पहलगामध्ये झालेला सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. पूर्वीचे दोन हल्ले जवानांवर करण्यात आले होते. आता मात्र पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्याने देशाला मोठा हादरा बसला आहे. या हल्ल्याने जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटनावर पुन्हा एकदा विपरीत परिणाम होणार आहे.

पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. या हल्यानंतर 12 दिवसांतच हवाई दलाने एअर स्ट्राईक केली होती. जैश ए मोहम्मदच्या पाकिस्तानातील बालाकोटमधील कॅम्पवर हल्ला चढवण्यात आला होता. 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानाच्या हद्दीत घुसत भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. या एअरस्ट्राईकने पाकिस्तानला मोठा संदेश दिला होता.

हल्ल्यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे विमान अपघातग्रस्त झाल्याने ते पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागले होते. त्यानंतर काही दिवसांनी भारताच्या दबावानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारताकडून असाच करारा जवाब दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू असून लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट देण्यात आला आहे. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दाखवून दिलेली ताकद पुन्हा दिसू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT