
Pahalgam Terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 28 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पर्यटकांवर झालेल्या या भ्याड हल्ल्यानंतर संतप्त देशवासियांकडून चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. अशात सुरक्षा दलांनी हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांच्या मदतीने 3 हल्लेखोरांचे स्केच तयार केले आहे. या तिघांची ओळख पटवण्यातही सुरक्षा दलाला यश आलं आहे.
सुरक्षा दलांनी जारी केलेल्या स्केचमधील तिघांचीही ओळख पटली असल्याचे सांगितले जाते. आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. याच तिघांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय आहे. याशिवाय एक फोटोही व्हायरल होत आहे. यात चौघे जण लष्कराच्या गणवेशात दिसून येत आहेत. हा फोटो हल्ल्यापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते.
दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी रात्री गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरमध्ये दाखल झाले. आज (बुधवार) ते पहलागामध्ये जाणार आहेत. तेथे ते सुरक्षासंदर्भात आढावा घेतली तसेच घटनास्थळा देखील भेट देण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्यासोबत फोनद्वारे सौदी अरेबियातून संवाद साधला होता. त्यानतंर शहा हे तातडीने काश्मीरला रवाना झाले.
दहशतवादी हल्ल्याच्या निषेध करणारे ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकार कठोर कारवाई करेल याबद्दल माझ्या मनात कुठलीच शंका नाहीये... आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील. सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, बाकीच्यांचं माहित नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नक्की सरकारच्या सोबत असेल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.