New Delhi News: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ल्याची गंभीर दखल घेतली असून या हल्ल्यातील दहशतवाद्यांना सोडणार नाही,असा इशारा दिला आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी,नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांनाही गमवावं लागलं आहे. या हल्ल्यानंतर आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी कठोर भूमिका घेत भारताचे आक्रमक इरादे स्पष्ट केले आहेत.
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. भीती दहशत पसरविणार्या दहशतवाद्यांचे नापाक इरादे कधीच पूर्ण होऊ देणार नाही. हा हल्ला करणार्या कोणालाही सोडण्यात येणार नाही. तसेच लवकरच भारताकडून दहशतवादी हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिले जाईल.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे बुधवारी(ता.23) एका वायुसेनेच्या कार्यक्रमात बोलत होते.त्यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यावरही (Pahalgam Terroist Attack) कठोर शब्दांत भाष्य केलं.
सिंह म्हणाले, यावेळी दहशतवाद्यांनी पहलगाममधील पर्यटकांना लक्ष्य करताना धर्माला केंद्स्थानी ठेवत हा हल्ला घडवून आणला.पण दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की,सगळं जग बघत राहील ,अशी ग्वाही देतानाच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद रोखण्यासाठी भारताचं झिरो टॉलरन्स पॉलिसी असल्याचंही यावेळी सांगितलं.
राजनाथ सिंह म्हणाले, या अशा हल्ल्यांना भारत कधीही घाबरणार नाही,तसेच डगमगणार पण नाही.पडद्यामागं अशा दहशतवादी हल्ल्यांची कटकारस्थानं रचणाऱ्यांनाही आता कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचंही यावेळी सिंह यांनी स्पष्ट केलं.
भारतीय वायुसेनेनं स्वातंत्र्यानंतर सातत्यानं नवनवीन आव्हानं सक्षमपणे पेलली आहे. 1996,1975,1999 अशा युध्दातही भारतीय वायुसेनेनं नेहमीत शत्रूच्या इराद्यांना नेस्तनाबूत केलं आहे. त्यामुळेच इतकी आव्हानं पेलताना आणि कमीत कमी साधनसामग्रीसह सुरुवातकरुनही आज भारतीय वायुसेना ही जगातील एक ताकदवान सेना म्हूणन पाहिले जाते,असे कौतुकोद्गारही राजनाथ सिंह यांनी यावेळी आपल्या भाषणात काढले.
महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने विशेष बैठक घेतली. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबाबत तातडीने मदतकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी जम्मू-काश्मीर सरकार आणि केंद्र शासनाच्या यंत्रणांची समन्वय निर्माण करण्यात आला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष जबाबदारी टाकली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.