Pahalgam terror attack : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने अनुभवला पहलगाम हल्ल्यावेळीचा थरार; सगळा घटनाक्रमच सांगितला...!

Political News : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना प्राण गमवावे लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला.
Suresh Birajdar in kashmir valley
Suresh Birajdar in kashmir valley
Published on
Updated on

Mumbai News : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 28 भारतीय पर्यटकांना प्राण गमवावे लागला. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना पहलगाममधील बैसरण व्हॅलीत घडली. याचवेळी उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार हे आपल्या कुटुंबीयांसमवेत वैष्णवी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी मंगळवारी पहलगामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला.

ही संपूर्ण घटना घडत असतानाच बिराजदार हे बैसरण व्हॅलीच्या शेजारीच असलेल्या बेताब व्हॅलीमध्ये पर्यटन करीत होते. त्यांनी या ठिकाणी अनुभवलेल्या या संपूर्ण थरारक घटनाक्रमाची माहिती 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते सुरेश बिराजदार हे कुटुंबासह 18 एप्रिलला काश्मीरला गेले होते. या काळात त्यांनी सुरुवातीला वैष्णवीदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर सोमवारपासून पहलगाम परिसरातच पर्यटन करीत होते. मंगळवारी बिराजदार हे बैसरण व्हॅलीच्या शेजारीच जवळच असलेल्या बेताब व्हॅलीमध्ये पर्यटन करीत असतानाच दहशतवादी हल्ला होत असल्याची बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहचली. त्यानंतर लगेचच यंत्रणा सतर्क झाली होती.

Suresh Birajdar in kashmir valley
Shama Mohamed On Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसच्या शमा मोहम्मद आक्रमक; म्हणाल्या,रावळपिंडी उध्वस्त करा अन्...

मंगळवारी रात्री देखील ते पहलगाम परिसरात वास्तव्य होते. त्यांना कुठेच बाहेर पडता आले नाही. विशेष म्हणजे पहलगाम परिसरातच त्यांना मुक्काम करावा लागणार असल्याने त्यांच्या मनात भीती होती. या परिसरात मंगळवारी दुपारनंतर दहशहतीचे वातावरण होते. सगळीकडे आर्मी होती, नाका नाक्यावर चेकपोस्टस् होते, पण या परिसरात दहशतीमुळे कोणीच बाहेर दिसत नव्हते. मात्र, या ठिकाणाची संपूर्ण परिस्थिती भयावह होती.

Suresh Birajdar in kashmir valley
Pahalgam Terror Attack Live: राज ठाकरे संतापले! मोदी सरकारला म्हणाले, 'हल्लेखोरांचा असा बंदोबस्त करा की त्यांच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल....

त्या परिस्थितीच मंगळवारी रात्रीचा मुक्काम पहलगाम परिसरात करावा लागल्यामुळे पहिल्यांदातर अंगावर शहारेच आले. त्यानंतर बुधवारी सकाळी आम्ही विमानाने पहलगामवरून श्रीनगरला पोहचलो. बुधवारी रात्री श्रीनगरहून हैदराबादला विमान आहे. त्या विमानाने हैदराबादला जाणार असून तेथून कारने उमरग्याकडे रवाना होणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.

Suresh Birajdar in kashmir valley
Pahalgam terrorist attack : फिरायला गेले ते परतलेच नाहीत! दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 पुणेकरांसह महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू

अजितदादांनी केली फोनवरून विचारपूस

देशाचे नंदनवन असलेल्या भागात दहशतवाद्यांनी केलेला हा भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. हल्ला झाल्यानंतर लगेचच सैन्याने या परिसराचा ताबा घेतला असून सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. आमच्या समवेत आलेले सर्व पर्यटक सुखरूप आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे विचारपूस करून या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.

Suresh Birajdar in kashmir valley
Pahalgam Terror Attack : पतीला मारताच हल्लेखोर पत्नीला म्हणाले मोदींना जाऊन सांग..., दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या महिलेने सांगितली 'आपबिती'

पर्यटनावर होणार मोठा परिणाम

कश्मीरमध्ये पर्यटनासाठी फिरत असताना येथील स्थानिक नागरिकांशी चर्चा केली असता स्थानिक नागरिक दहशतवाद्यांच्या व पाकिस्तानच्या विरोधात असल्याचा जनमानस आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट रचला होता. या हल्ल्यामुळे येथील यात्रेवर व पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे. येथील नागरिकांना उपजीविकेसाठी पर्यटन व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते, हे सांगताना काही स्थानिक नागरिकाच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आल्याचे बिराजदार म्हणाले.

Suresh Birajdar in kashmir valley
Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ला अमानवीय... औवेसींचाही संताप; पीडित कुटुंबाला दिला धीर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com