Narendra Modi And Donald Trump.jpg Sarkarnama
देश

India vs Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना भारतही देणार मोठा झटका; आता 'टेरिफ'वर आरपारची लढाई...

Trump’s Tariff Hike on Indian Steel and Aluminium : भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका देण्यात आला आहे. भारतातून येणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियमवर अमेरिकेने वाढीव टॅक्स लादला आहे.

Rajanand More

Impact on India-US Trade Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने जगभरातील अनेक देशांवर टेरिफ बॉम्ब टाकला जात आहे. त्यामुळे या देशांकडून उघडपणे नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातून भारतही सुटलेला नाही. पण आता भारताने टेरिफवरून आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत आरपारची लढाऊ सुरू केली आहे.

भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका देण्यात आला आहे. भारतातून येणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियमवर अमेरिकेने वाढीव टॅक्स लादला आहे. आता भारतानेही जोरदार प्रत्युत्तर देत जागतिक व्यापार संघटनेकडे अमेरिकेच्या वस्तूंवरही टेरिफ लावण्याचा प्रस्ताव अधिक कडक केला आहे. अमेरिकेने नुकताच स्टील आणि अल्युमिनियमवरील टेरिफ अनुक्रमे 25 व 50 टक्के केला आहे.

टेरिफ वाढल्याने भारताच्या सुमारे 63 हजार कोटींच्या स्टील आणि अल्युमिनियमच्या निर्यातीवर प्रभाव पडला. तर अमेरिकेला त्यातून सुमारे 32 हजार कोटींची टॅक्स वसुली होण्याचा अंदाज आहे. भारताने या टेरिफ वाढीविरोधात 9 मेला WTO मध्ये एक नोटिफिकेशन जारी केले होते. त्यामध्ये अमेरिकी वस्तुंवरही टेरिफ लावण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावेळी टॅक्स वसुलीचा अंदाज 1.91 बिलियन डॉलर एवढा होता. पण अमेरिकेने 50 टक्केंपर्यंत टेरिफ वाढविल्याने भारतानेही हा प्रस्ताव अपडेट केला आहे, असे वृत्त 'न्यूज 18' ने दिले आहे.

नव्या नोटिफिकेशनमध्ये भारताने जेवढे नुकसान निर्यातीवर होत आहे, तेवढाच टॅक्स लावण्याचे म्हटले आहे. म्हणजेच भारताकडूनही 3.82 बिलिनय डॉलर एवढा ट्रक्स वसुल केला जाऊ शकतो. भारताने टेऱिफ वाढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. मात्र, त्या वस्तू कोणत्या असतील, नेमका टॅक्स किती असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भारताने 2019 मध्ये अमेरिकेच्या 28 वस्तूंवर टॅक्स लावला होता.

एकीकडे भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. अशा स्थितीत भारतानेही कडक भूमिका घेत एकप्रकारे अमेरिकेला इशाराच दिला आहे. पण व्यापार करारावर त्याचा विपरित परिणामही होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत इतर देशांवर टेरिफ लावत कोट्यवधी रुपयांची करवसुली केली जात आहे. या माध्यमातून ते संबंधित देशांसोबत व्यापार करारासाठी दबाव आणत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT