Maharashtra Politics : आमदार गायकवाडांनी भिरकवला दगड, वर्मी बसला घाव...

Sanjay Gaikwad’s Controversial Outburst : आमदार संजय गायकवाडांनी आपल्या कृतीचे समर्थनच केले आहे. कॅन्टीन चालकाकडून आरोग्याशी खेळ केल्याने मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरंच गायकवाड महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातलं बोलले.
MLA Sanjay Gaikwad
MLA Sanjay Gaikwad Sarkarnama
Published on
Updated on

बातमीत थोडक्यात काय?

  • शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील शिळ्या जेवणावरून कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे.

  • गायकवाड यांनी आपल्या कृतीचे समर्थन करत आरोग्याशी खेळ करणाऱ्याला धडा शिकवण्याचे कारण दिले, पण ही कृती कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याने टीकेचा धनी ठरले.

  • या घटनेच्या निमित्ताने सर्वसामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होणं, त्यांचा आवाज न ऐकला जाणं आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी हायलाइट झाली आहे.

How Political Culture Is Being Questioned After the Brawl :आमदार निवासात शिळं जेवण ताटात आलं म्हणून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातला. टॉवेल, बनियनवर येत त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांना लगावलेले ठोसे कॅमेरात कैद झाले आहेत. ते सोशल मीडियात बरेच व्हायरल झाले, त्याच्या रील्सही बनल्या. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. कॅन्टीनवर कारवाई झाली, पण अजून गायकवाडांवर मात्र गुन्हा दाखल झालेला नाही.

आमदार गायकवाडांनी आपल्या कृतीचे समर्थनच केले आहे. कॅन्टीन चालकाकडून आरोग्याशी खेळ केल्याने मारहाण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. खरंच गायकवाड महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनातलं बोलले. आरोग्याशी खेळ करणाऱ्याला धडा तर शिकवायलाच पाहिजे. पण सगळ्यांना तुमच्यासारखी मारहाण करता येत नाही. आणि मारहाण केलीच तर त्याची कायद्याच्या कचाट्यात सुटका नाही. कारण तो आमदार नसतो. तो बिचारा सर्वसामान्य नागरिक असतो. त्याला फक्त मतदानावेळीच विचारले जाते. व्यवस्थेशी झगडा करताना त्याच्या मनात असे ठोसे मारण्याचा विचार अनेकदा डोकावत असेल, पण परिस्थितीसमोर तो खुजा असतो.

हिंसेचे समर्थन कुणीही करणार नाही. ‘रोटी, कपडा और मकान’ या तीन प्रमुख गरजांसाठी रोजचा झगडा असलेला सर्वसामान्य नागरिक तर नाहीच नाही. पण म्हणून त्याला दुर्लक्षित करूनही चालणार नाही. गायकवाडांच्या राड्यानंतर महाराष्ट्रात सोशल मीडियातही असाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. अनेकांनी पोस्ट केल्यात, व्हिडीओ केले आहेत.

MLA Sanjay Gaikwad
Shashi Tharoor : शशी थरूर यांच्याकडून काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा सर्वात मोठा घाव; म्हणाले, आताचा भारत हा 1975...

शिळ्या जेवणामुळे आमदार मारहाणीपर्यंत उतरत असतील तर मग बोगस बियाणं मिळालेले, मातीमोल किंमती विकले जाणारे धान बघून रडणारा-आत्महत्या शेतकरी, योजनांचे पैसे न मिळालेले लाभार्थी, लाखोंची फी भरूनही शिक्षणातील बोगसपणामुळे वैतागलेले पालक, महागाईने त्रासलेल्या गृहिणी, फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह हताशपणे पाहणारे आई-वडील, रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यात आपल्या लेकराला जन्म देणारी माता... यांनी कुणाला ठोसा मारायचा?

हा प्रश्न महाराष्ट्रातील अनेक जण विचारत आहेत. ग्रामपंयायतीपासून राज्य सरकारपर्यंत पावलोपावली सर्वसामान्यांची कोणत्या ना कोणत्या कारणाने कुचंबना होत असते. प्रशासनातील लाच दिल्याशिवाय काम न करणारे काही अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांची कामे लालफितीत अडकून पडतात. त्याचा प्रचंड मनस्ताप त्यांना सहन करावा लागतो. त्याने कुणाकडं पाहायचं? मायबाप सरकार आपली व्यथा ऐकेल, या भाबड्या आशेवर तो रोजचा दिवस पुढे ढकलत असतो. पण कुणाला मारहाण करण्याची त्याची हिंमत होत नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा ही नकोच. पण म्हणून त्यांच्या जीवाचे काहीच मोल नाही का?

MLA Sanjay Gaikwad
BJP President Election : भाजप अध्यक्ष निवडीसाठी RSS ने सेट केलाय फॉर्म्यूला? हवाय असा धडाकेबाज नेता...

प्रामुख्याने, लोकप्रतिनिधींनी तरी नागरिकांच्या समस्या, अडचणी समजावून घेत सोडवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा असते. म्हणून ते त्यांच्या पायऱ्या झिजवत असतात. काही लोकप्रतिनिधीही झोकून देत काम करतात. अडचणीला धावून जातात. पण असे चित्र क्वचितच दिसते. आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या भागाचा विकास करत नसतील, आणि त्यामुळे सर्वसामान्यांना रोजच त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांनी कुणाला प्रश्न विचारायचा, कुणाकडे मदतीच्या आशेने पाहायचे? की त्यांनी हातात दगड घेत व्यवस्थेवर भिरकवायचा? 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न :

  • प्रश्न: संजय गायकवाड कशामुळे वादात सापडले?
    उत्तर: शिळ्या जेवणावरून त्यांनी कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

  • प्रश्न: त्यांनी मारहाणीचे समर्थन कसे केले?
    उत्तर: त्यांनी निकृष्ट अन्न आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे कारण दिले.

  • प्रश्न: या घटनेवर समाजमाध्यमांची प्रतिक्रिया काय होती?
    उत्तर: सोशल मीडियावर रील्स, पोस्ट्स, आणि जनतेचा रोष व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com