BJP President Election : भाजप अध्यक्ष निवडीसाठी RSS ने सेट केलाय फॉर्म्यूला? हवाय असा धडाकेबाज नेता...

Why is the BJP President Election Being Delayed? : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानली जात आहे. आरएसएसकडून पडद्यामागून अध्यक्ष निवडीसाठी फॉर्म्यूला सेट केल्याची चर्चा आहे.
Narendra Modi, Mohan Bhagwat
Narendra Modi, Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Role of RSS in Shaping the Selection Formula : भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण, याची चर्चा मागील काही महिन्यांपासून राजकीय वुर्तूळात रंगली आहे. सातत्याने अनेक नावे समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी महिला अध्यक्षांची चर्चाही सुरू होती. आता बहुतेक राज्यांमध्ये भाजपला नवे प्रदेशाध्यक्षही मिळाले आहेत. पण अजूनही राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामागच्या कारणांचा ऊहापोह आता सुरू झाला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानली जात आहे. आरएसएसकडून पडद्यामागून अध्यक्ष निवडीसाठी फॉर्म्यूला सेट केल्याची चर्चा आहे. संघाकडून कोणत्याही नेत्याचे नाव पुढे करण्यात आले नसले तरी अध्यक्षपदासाठी निकष निश्चित करण्यात संघाचीच महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. हे निकष पूर्ण करणारा नेता कोण, हे शोधण्यात विलंब लागल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे.

अध्यक्षांचे नाव निश्चित करण्यासाठी विविध स्तरांवर संघटनात्मक अनेक बैठका झाल्या आहेत. आता केवळ अध्यक्षांच्या नावाची घोषणा करणेच बाकी आहे. पण संघाच्या सहमतीशिवाय आणि त्यांचे निकष पूर्ण झाल्याशिवाय हे नाव जाहीर केले जाणार नाही, असे दिसते. संघाच्या निकषांमध्ये संबंधित नेता सर्वसमावेशक, सहज उपलब्ध होणारा, तळागाळापर्यंत काम केलेला आणि संघटनात्मक कौशल्य असलेला असायला हवा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संबंधित नेत्याने वयाची साठी ओलांडलेली नसावी.

Narendra Modi, Mohan Bhagwat
Bihar Elections : दिल्लीत सत्ताधाऱ्यांना हादरवणारा मराठी नेता; उत्तर भारत कधीच विसरणार नाही नाव...

पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक तसेच सरकारचे नेतृत्व यांमधील दुवा म्हणून पक्षाच्या अध्यक्षांनी काम करायला हवे, जेणेकरून पक्षासह सरकारची प्रतिमाही उंचावण्यास मदत होऊ शकेल, असे संघाचे म्हणणे असल्याची चर्चा आहे. आगामी 2029 ची लोकसभा निवडणूकही नव्या अध्यक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या निवडणुकीपर्यंत संबंधित नेत्याने पक्ष संघटन मजबूत करण्याबरोबरच कमकुवत स्थिती असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकार आणि पक्षासाठी झोकून देत काम करणेही अपेक्षित आहे.

मागीलवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला सत्ता मिळाली असली तरी भाजपला एकहाती बहुमत मिळवता आलेले नाही. त्यामुळेच 2029 मधील निवडणूक भाजपसाठी महत्वाची मानली जात आहे. त्यासाठी भाजप अध्यक्षांची जबाबदारी मोठी असणार आहे. केवळ रिक्त जागा भरण्यासाठी ही निवड असणार नाही. ही निवड करताना अनेक कंगोरे विचारात घ्यावे लागणार आहेत.

Narendra Modi, Mohan Bhagwat
Amit Shah Retirement : मोठी बातमी : अमित शहांनी जाहीर केला रिटायरमेंट प्लॅन; म्हणाले, निवृत्तीनंतर...

भाजपच्या संघटनात्मक कामामध्ये संघाकडून ढवळाढवळ केली जात नाही, असे पक्षाचे नेते सांगतात. पण अध्यक्ष निवड ही पक्षाचे धोरण, भूमिका, तत्वांचा विचार अन् राजकीय परिस्थिती विचारातून घेऊन व्हायला हवी, अशी संघाची इच्छा असावी. त्यामुळे नेता निवडीमध्ये कस लागताना दिसत आहे.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे ही निवड करताना जातीय समीकरणांचाही विचार केला जाण्याची शक्यता आहे. एक देश-एक निवडणूक, महिला आरक्षण, समान नागरी संहिता, नागरिकता कायदा, दक्षिणेकडील हिंदी भाषा वाद असे अनेक मुद्देही आगामी काळात राजकीय वर्तूळात गाजणार आहेत. त्याचा परिपाक काहीही असो, पण चांगल्या-वाईट परिस्थितीत पक्षाचे संघटन कौशल्याने मजबूत करणारा नेता संघाला हवा आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com