India China Relation Sarkarnama
देश

Modi China visit : मोदींचा चीन दौरा अन् भारत-अमेरिका वाद! चीनने अचूक टायमिंग साधलं, पंतप्रधान मोदींसाठी थेट रेड कार्पेट अंथरलं!

SCO Summit 2025 : अमेरिका-भारत संबंध जास्तीचे ताणले असतानाच आता चीनने मात्र भारतासाठी रेड कार्पेट अंथरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Jagdish Patil

Modi China visit : राजकारणात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं धोरण वापरलं जातं. याचाच प्रत्यय आता जागतिक राजकारणातही पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेच्या या निर्यणाचा विरोध भारताचा शत्रू राष्ट्र असलेल्या चीनने केला आहे. पाकिस्तानशी जवळीक असतानाही चीनने भारताची बाजू घेतल्यामुळे आता जागतिक राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिका-भारत संबंध जास्तीचे ताणले असतानाच आता चीनने मात्र भारतासाठी रेड कार्पेट अंथरल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीसाठी चीनला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मोदींच्या या संभाव्य चीन दौऱ्याआधीच चीनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शांघाय शिखर परिषदेच्या दौऱ्याचं चीन स्वागत करणार असल्याचं अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे चीन भारत-अमेरिकेमधील तणावाचा फायदा घेत भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

शिवाय चीनन केवळ निवदेन जारी केलं नाही. तर त्यासोबत एक महत्वाची प्रतिक्रिया देखील दिली आहे. पंतप्रधान मोदी SCO शिखर परिषदेसाठी चीनला भेट देणार असल्याच्या बातमीनंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं की, "SCO तियानजिन शिखर परिषद ही एससीओच्या स्थापनेपासूनची सर्वात मोठी शिखर परिषद असेल. या परिषदेसाठी चीन पंतप्रधान मोदींचे चीनमध्ये स्वागत करत आहे.

आम्हाला विश्वास आहे की सर्व पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही परिषद एकता, मैत्री आणि फलदायी मेळावा ठरेल. तसेच एससीओ विकासाच्या नवीन टप्प्यात प्रवेश करेल. ज्यामध्ये अधिक एकता, समन्वय, गतिमानता आणि उत्पादकता असेल." चीनच्या या प्रतिक्रियेमुळे आता भारत चीन संबंध सुधारण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात तियानजिन येथे या एससीओ बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT