Sheikh Hasina Sarkarnama
देश

Sheikh Hasina : शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या बांगलादेशच्या मागणीवर भारताने दिली 'ही' प्रतिक्रिया

India reaction to Bangladesh on Sheikh Hasina : भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी याबाबत खुलास केला आणि सांगितले: की...

Mayur Ratnaparkhe

Bangladesh Request To India: बांगलादेशात सत्तापालट झाल्याच्या काही महिन्यानंतर अखेर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने भारताकडे शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. बांगलादेशने यासाठी भारताला एक पत्रही पाठवले आहे. ज्यावर आता भारताकडूनही उत्तर देण्यात आले आहे.

भारताने यावर 'नो कमेंट' म्हटले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जायसवाल यांनी याबाबत खुलास केला आणि सांगितले की, सध्या तरी नवी दिल्लीकडून याप्रकरणावर कोणतीही टिप्पणी नाही.

तर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, आम्ही पुष्टी करतो की, आज बांगलादेश (Bangladesh) उच्चायुक्तलयाकडून प्रत्यापर्णाच्या विनंतीसंदर्भात एक व्हर्बल नोट प्राप्त झाली आहे. सध्या तरी या प्रकरणी आमच्याकडून कोणतीही टिप्पणी नाही.

बांग्लादेशमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर शेख हसीना देश सोडून पळाल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. त्या राजधानी दिल्लीत एका सुरक्षितस्थळी राहत असल्याचे सांगितले जाते. मागील काही महिन्यांपासून त्या भारतात आहेत. बांग्लादेशच्या गृह विभागाचे सल्लागार निवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांनी हसीना यांच्या प्रत्यपर्णाच्या मागणीबाबत माहिती दिली.

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यामुळे भारत धर्मसंकटात सापडला आहे. बांग्लादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करणारे पत्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला लिहिले आहे. यात हसीना यांना बांग्लादेशला सोपवण्याबाबतच्या अधिकृत मागणीमुळे आता भारताला याबाबत आपली भूमिका ठामपणे मांडावी लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT