Shivsena UBT : 'शेख हसीना लाडकी बहीण पण बांगलादेशातील हिंदू भाऊ बहि‍णींचे काय?', उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Shivsena UBT Protest Pune : बांगलादेशातील हिंसक हल्ल्यांमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देखील भारताचा आसरा घ्यावा लागला. भारत हा सहिष्ण देश असल्याने त्यांना आपण आसरा दिला आहे, असे संजय मोरे म्हणाले.
Shivsena UBT
Shivsena UBTsarkarnama
Published on
Updated on

Pune News : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात आश्रय देऊन त्यांना लाडकी बहीण करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी बांगलादेश मधील हिंदू भाव-बहिणींचं काय? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपस्थित करण्यात आला. तसेच सरकारने बांगलादेश मधील होत असलेल्या हिंदूंवरील हल्याच्या विरोधात ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदू नागरिक आणि मंदिरांवरील होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या वतीने आज (शनिवारी) पुण्यात आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर अत्याचार होत आहेत. बांगलादेशातील इस्कॉन या मानवतावादी, अध्यात्मिक संघटनेच्या सदस्यांवर बांगलादेश सरकार अन्याय, अत्याचार करत आहे. बांगलादेशात हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होऊ नये यासाठी हे सर्व करण्यात येत आहे. भारताच्या प्रयत्नांमुळे बांगलादेशची निर्मिती झाली आहे. हे त्या ठिकाणचे नागरिक विसरले आहेत.

Shivsena UBT
Ambadas Danve-Eknath Shinde News : 'No caption needed'! एकनाथ शिंदे हतबल, अंबादास दानवेंनी साधला निशाणा

बांगलादेशातील हिंसक हल्ल्यांमुळे पंतप्रधान शेख हसीना यांना देखील भारताचा आसरा घ्यावा लागला. भारत हा सहिष्ण देश असल्याने त्यांना आपण आसरा दिला आहे. आपण माणुसकी दाखवून शेख हसीना यांना देशाची लाडकी बहीण बनवली आहे. मात्र बांगलादेश मधील हिंदू भाऊ बहिणींवर होणारे अत्याचार हे थांबले गेले पाहिजेत. त्या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावरती उतरली आहे, असे मोरे यांनी सांगितले.

बांगलादेशला फोन लागत नाही का?

बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असताना केंद्र सरकार झोपले की काय? असा प्रश्न पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्व गुरु म्हणवतात . रशिया आणि युक्रेनचे युद्ध जर ते एका फोनवर थांबवलं, असं म्हणत असतील तर ते बांगलादेशमध्ये फोन का लावत नाही? त्या ठिकाणी त्यांची रेंज नाही का? असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला..

केंद्र सरकार अपयशी

निवडणुका आल्यानंतर फक्त बटेंगे तो कटंगे, एक है तो सेफ है अशा घोषणा देतात मात्र बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेतेसाठी काहीच करत नाहीत. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने या विरोधात प्रयत्न केले पाहिजेत त्या प्रमाणात केंद्र सरकारकडून हिंदूंना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात नसून त्यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याची टीका मोरे यांनी केली

Shivsena UBT
Assembly Session : विधीमंडळ आवारात झळकले ‘आय लव मारकडवाडी’चे फलक; विरोधकांचा ‘ईव्हीएम’वर पुन्हा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com