Mahesh Dixit IB .jpg Sarkarnama
देश

IB Chief News: जबरदस्त गुप्तचर नेटवर्क, दांडगा अनुभव,कलम 370 नंतर विशेष जबाबदारी; 'आयबी'ला मिळाला नवा 'डॅशिंग' अधिकारी

Central Government Decision: वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. महेश दीक्षित यांची भारताची प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान आयबी प्रमुख तपन डेका यांची जागा घेणार आहे. डेका यांचा कार्यकाळ कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.

Deepak Kulkarni

New Delhi News: वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. महेश दीक्षित यांची भारताची प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था असलेल्या इंटेलिजन्स ब्यूरो (आयबी) च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते विद्यमान आयबी प्रमुख तपन डेका यांची जागा घेणार आहे. डेका यांचा कार्यकाळ कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडून जगाला धडकी भरवणाऱ्या 'आयबी'चे प्रमुख म्हणून डॉ. महेश दीक्षित नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांसाठी असणार असून ते पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील.

पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. या समितीने दीक्षित यांना एफआर 56 (डी) आणि अखिल भारतीय सेवा (मृत्यू-सह-सेवानिवृत्ती लाभ) नियम, 1958 च्या नियम 16 (1अ) च्या तरतुदींनुसार मुदतवाढ दिली आहे.

इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेले महेश दीक्षित हे एक भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस अधिकारी आहेत. दीक्षित हे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दीक्षित हे तेलंगणा केडरचे अधिकारी आहेत. त्यांचा आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ आयबीमध्ये घालवला आहे.

महेश दीक्षित सध्या त्याचे विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. ते देशातील सर्वात अनुभवी गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. दीक्षित यांनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या क्षेत्रात कारकीर्द घडवली. नवी दिल्लीतील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयात विशेष संचालक पदावर पदोन्नती मिळण्यापूर्वी, आयपीएस महेश दीक्षित जम्मू आणि काश्मीरमध्ये सहायक इंटेलिजन्स ब्यूरो प्रमुख होते.

आयपीएस अधिकारी डॉ. महेश दीक्षित यांना गेल्या वर्षी गुप्तचर विभागाचे विशेष संचालक म्हणून बढती देण्यात आली होती. त्यानंतर ते आता आयबीच्या प्रमुखपदासह या गुप्तचर संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी बनले आहेत. ब्युरो प्रमुख म्हणून, 1ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केल्यानंतरच्या घडामोडींमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

1 जुलै 2026 रोजी इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून पदभार स्वीकारणारे ते कदाचित पहिले डॉक्टर आहेत. त्यांच्या मुत्सद्दी कौशल्यामुळे त्यांना ईशान्य आणि लडाखमधील कारवायांपासून ते नक्षलविरोधी पथकांपर्यंत विविध प्रकारच्या संवेदनशील जबाबदाऱ्या हाताळता आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT