Maharashtra News: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड: मुख्यमंत्री फडणवीस-ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास, नेमकं काय घडलं?

Shivsena- bjp News: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी (ता.26) एकाच विमानानं प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही नेते एकाच विमानानं नागपूरला रवाना झाले आहेत.
Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणं 2019 नंतर दिवसागणिक कठीण होत चाललं आहे. राजकारणात कोणीच एकमेकांचे कायमचे शत्रू नसतात, तसेच कोणीच कायमचे मित्रही नसतात. याचदरम्यान,राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी (ता.26) एकाच विमानानं प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे. हे दोन्ही नेते एकाच विमानानं नागपूरला रवाना झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वीच ऑपरेशन टायगर यशस्वी केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. नऊपैकी सहा खासदार फुटणे हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या चार वर्षांत दुसर्‍यांदा शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे पेटून उठले आहेत. त्यांनी थेट सहाच्या सहा बंडखोरांच्या मतदारसंघांचा दौरा करत तेथे या सर्व खासदारांविरोधात राजकीय वातावरण तापवणार आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या 6 बंडखोर खासदारांविरोधात थेट त्यांच्याच मतदारसंघात जाऊन धडक दौरे आणि जाहीर सभा घेण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांच्या शिवसेना पक्षबांधणी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद हाच या मोहिमेचा उद्देश आहे.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Lohgad Crime Case: केतनच्या वडिलांनी भेट घेताच CM फडणवीसांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; 'लोहगड' प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात, उज्ज्वल निकमांचीही 'एन्ट्री'

या मोहिमेअंतर्गत उद्धव ठाकरे हे शनिवार व रविवार असा दोन दिवसीय मराठवाडा, विदर्भ दौरा केला आहे. खासदार संजय देशमुख (यवतमाळ) खा. संजय जाधव (परभणी), खा. ओमराजे निंबाळकर (धाराशिव), खा. नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) शिर्डी खा. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) या सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावे घेणार आहेत. या मोहिमेची सुरूवात ठाकरेंनी मुंबईतील फुटलेले खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात भांडुपचा दौरा करत केली होती.

याच दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आज विमानानं नागपूरला रवाना झाले आहेत. याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही होते. या विमानात दोन्ही नेत्यांचे एखत्र प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत. ठाकरेंसोबत यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे हेही उपस्थित असल्याचं समोर येत आहेत. या दोन्ही नेत्यांंमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याचंही समोर येत आहे.

Uddhav Thackeray Devendra Fadnavis
Uddhav Thackeray Visit : ओम राजेनिंबाळकरांचे राजकारण संपवण्यासाठी उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये...लोकसभेसाठी विरोधात भावालाच ताकद देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com