Donald Trump, Ali Khamenei Sarkarnama
देश

Iran fatwa Donald Trump : ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणचा फतवा जारी, खामेंनीच्या हत्येचा घेणार बदला ; लाल ध्वज फडकवला

Iran issues fatwa against Donald Trump : सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची घोषणा इराणने केली आहे. त्यासाठी जामकरन मशि‍दीवर लाल ध्वज फडकवण्यात आला आहे

Ganesh Sonawane

Iran News : अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणसाठी ही सर्वात मोठी हानी असून इराण खामेंनीच्या हत्येचा बदला घेणार आहे. संतापलेल्या इराणने आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात फतवा जारी केला आहे.

इराणमधील पवित्र जामकरन मशि‍दीवर लाल ध्वज फडकवण्यात आला आहे. या मशिदीवर ध्वज फडकवणे हा शत्रूला थेट संदेश मानल्या जातो. शिया परंपरेत बदला घेण्यासाठी लाल ध्वज फडकवला जात असतो. इराणची ही पवित्र मशीद खास या ध्वजासाठी ओळखली जाते. आता इराणचे नागरिक, शिया मुस्लिम हे कोणत्याही मार्गाने हा बदला घेऊ शकतात याचे हे प्रतिक असल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तरित्या केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलगी, जावई, नातू ,सून सगळेच ठार झाले आहे. इराणचे अनेक नेते व लष्करी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात फतवा जारी न करता ट्रम्प विरोधातच हा फतवा का जारी करण्यात आला यावरुनही चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी खामेनी यांच्या मृत्यूनंतर म्हटलं की, इतिहासातील सर्वात क्रुर व्यक्तींपैकी एक खामेनी मारला गेला आहे. हा इराणच्या जनतेसाठी तसेच अमेरिका व जगभरातील देशांसाठी न्याय आहे. (War)

खामेनी यांचा मृत्यू हा इराणसह जगभरातील शिया समाजासाठी मोठा धक्का मानला जात असून या हत्येचा बदला घेण्यासाठीच ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणकडून फतवा जारी करण्यात आला आहे. त्यासाठी जामकरन मशि‍दीवर त्यासाठी लाल ध्वज फडकवण्यात आला आहे. याआधीही प्रमुख नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा लाल रंगाचा ध्वज फडकवण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT