Ali Khamenei Death : मुलीला मारलं, जावयालाही मारलं… आता खामेनेईंच्या संपत्तीचा वारसदार कोण? एकूण नेटवर्थ किती?

Ayatollah ali khamenei death : इस्रायल आणि अमेरिकेने मिळून केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण इराणवर शोककळा पसरली आहे.
Ayatollah ali khamenei death
Ali Khamenei, Donald Trump sarkarnama
Published on
Updated on

Iran News : इस्रायल आणि अमेरिकेने मिळून केलेल्या लष्करी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घोषणेनंतर इराणी माध्यमांनीही पुष्टी केली आहे की, इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा युद्धात मृत्यू झाला आहे. इराणवर शोककळा पसरली असून सरकारने देशात ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.

खामेनींसह त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांचाही या युद्धात मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. खामेनी यांची मुलगी, जावई, सून आणि नातू ठार झाल्याचं वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इराणच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने दिलं आहे. त्यामुळे आता खामेनी यांचा उत्तराधिकारी कोण होईल? असा प्रश्न निर्माण झाला.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचा मुलगा मोजतबा खामेनी यांना सत्तेची सूत्रे सोपवण्यात येत आहेत, असे अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार म्हटले आहे. मोजतबा खामेनी हे त्यांच्या वडिलांप्रमाणेच शिया धर्मगुरू असले तरी ते विलासी जीवन जगतात. इराणपासून लंडनपर्यंत त्यांची अनेक घरे आणि हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर आता इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी त्यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा सरकारी प्रसारमाध्यमांनी केली आहे.

Ayatollah ali khamenei death
Ayatollah Khamenei Death : मोठी बातमी! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी ठार

अली खामेनेई यांनी तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ इस्लामिक रिपब्लिकवर राज्य केले आहे. खामेनी यांचे अधिकृत वेतन मर्यादित असल्याचे वृत्त आहे, परंतु आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये असा दावा केला आहे की ते सेताद नावाच्या संस्थेमार्फत प्रचंड संपत्ती नियंत्रित करतात. २०१३ च्या आंतरराष्ट्रीय तपासणीत सेताद यांची संपत्ती अंदाजे $९५ अब्ज (अयातुल्ला अली खमेनी यांचे नेटवर्थ) होती, तर इतर अंदाजानुसार ही संख्या $२०० अब्ज (१८,२१५ कोटी रुपये) इतकी होती. तथापि, या दाव्यांची स्वतंत्र पडताळणी करणे कठीण आहे आणि इराणी सरकार या आकडेवारीवर वेगळी भूमिका ठेवते.

Ayatollah ali khamenei death
US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धात भारत कोणाच्या बाजूने? परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका; "इराण आणि..."

अली खामेनेई यांचा युद्धात झालेल्या मृत्यूनंतर इराणमध्ये एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. ४० दिवसांच्या शोककाळात देशातील सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत. मोजतबा खामेनेई यांच्या नेतृत्वाखाली इराण आपली पुढील परराष्ट्र धोरणे आणि लष्करी कारवाया कशा प्रकारे राबवतो, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com