Visuals show aftermath of Iran’s missile attack on the US Air base in Doha, Qatar sarkarnama
देश

Iran Missile Strike - इराणचा अमेरिकेवर पलटवार! ; दोहा येथील अमेरिकन एअर बेसवर क्षेपणास्त्रे डागली

Iran attack on US Airbase - अमेरिकेकडून इराणवर हल्ले केले गेल्यानंतर, आता इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

Mayur Ratnaparkhe

Iran Launches Missile Strike on US Military Base in Doha -इराण आणि इराकमधील युद्ध आता चांगलच भडकलं आहे. त्यात अमेरिकेनेही उडी घेतल्याने याला अधिकच गंभीर रूप प्राप्त होवू लागलं आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले केले गेल्यानंतर, आता इराणनेही अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

कतारमधील अमेरिकेच्या एअर बेसवर इराणने क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, काही काळापूर्वीच कतारने आपले हवाई क्षेत्र बंद केल्याचे वृत्त समोर आले होते. तर रविवारी अमेरिकेने हल्ले केल्यानंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देवू अशी शपथच घेतली होती.  

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार कतारची राजधानी दोहामध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज झाले आहेत. विशेष म्हणजे कतारच्या परराष्ट्र मंत्रालायने आपल्या नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या हवाई क्षेत्रातील वाहतूक तात्पुरती बंद केल्याची घोषणाही केली होती.

तर रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर दहा क्षेपणास्त्र डागली आहेत. शिवाय, इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने याची पुष्टी देखील केली आहे. आता इराणने अमेरिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. तर, इराणकडून अशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी अमेरिकेलाही कल्पना होतीच त्यामुळे अमेरिकाही तशा तयारीत होती,  अमेरिकेने इराणचे अनेक क्षेपणास्त्र ही हवेतच पाडल्याचेही समोर येत आहे.

या आधी अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ला केला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली होती. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT