
America Attacks Iran : इराण आणि इस्रायलमधील युद्धात आता महासत्ताक राष्ट्र असलेल्या अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुस्थळांवर अमेरिकेने हल्ला केला आहे.
या कारवाईनंतर इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे आभार मानले आहेत. नेतान्याहू म्हणाले, "अमेरिका खरंच अद्वितीय आहे. अमेरिकेने असं काही केलं आहे जे जगातील दुसरं कोणतंही राष्ट्र करू शकणार नाही. इतिहासात नोंद होईल की अध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक सत्तेला आणि सर्वात धोकादायक शस्त्रास्त्रांना थोपवण्यासाठी प्रयत्न केले." नेतान्याहूंनी अध्यक्ष ट्रम्प यांचे सैन्य कारवाईबद्दल अभिनंदन करत आभार मानले.
नेतन्याहू पुढे म्हणाले की, ऑपरेशन राइजिंग लाईनमध्ये इस्रायलने खरोखरच उल्लेखनीय कामगिरी केली आहे, पण आज रात्री इराणच्या अणुउर्जा प्रकल्पांवर करण्यात आलेल्या कारवाईत अमेरिका अद्वितीय ठरली आहे. अमेरिकन सैन्याने असं काही करून दाखवलं आहे जे या पृथ्वीवरील कोणतंही दुसरं राष्ट्र करू शकलं नाही. इतिहासही याची नोंद ठेवेल की अध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक व्यवस्था — आणि सर्वात धोकादायक शस्त्रास्त्रांना नकार देण्यासाठी प्रयत्न केले.
अमेरिकेच्या सैन्य कारवाईबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी देखील आनंद व्यक्त केला आणि सैनिकांचे अभिनंदन केले. ट्रम्प म्हणाले की, ही सैन्य कारवाई पूर्ण केल्यानंतर आमचे सैनिक सुरक्षितपणे अमेरिकेत परत येत आहेत. "आपल्या महान अमेरिकन वीर सैनिकांचे अभिनंदन! जगात अशी दुसरी कोणतीही सेना नाही जी हे करू शकली असती. आता शांततेचा काळ आहे! या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."
अमेरिकेने रविवारी सकाळी इराणमध्ये घुसून हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणने आता प्रतिहल्ला सुरु केला आहे. चवताळलेल्या इराणने इस्रायलवर हल्ले सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इस्रायलची राजधानी असलेल्या जेरुसलेम आणि तेल अविव या दोन शहरांवर इराणने हल्ला चढवला आहे. ( Israel Iran war )
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.