Donald Trump  Sarkarnama
देश

Donald Trump: इराणनं झोप उडवलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन लष्करावरच मोठा सर्जिकल स्ट्राईक, थेट लष्करप्रमुखांनाच तडकाफडकी हटवलं

Iran-America-Israel War: अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या 35 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसऱ्या बाजूने इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देताना अमेरिका आणि इस्त्रायलवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराणने अमेरिकेच्या नाकीनऊ आणल्याचं दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Donald Trump News: अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये गेल्या 35 दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसऱ्या बाजूने इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देताना अमेरिका आणि इस्त्रायलवर मिसाईल हल्ले केले जात आहेत. या युद्धात इराणने अमेरिकेच्या नाकीनऊ आणल्याचं दिसून येत आहे. अशातच आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करावरच सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांना तडकाफडकी त्यांच्या पदावरुन दूर सारलं आहे.जॉर्ज यांना सक्तीच्या निवृत्तीसाठी दबाव टाकण्यात आल्याची चर्चा आहे. याआधी ट्रम्प यांनी चेअरमन ऑफ जॉईंट चीफ ऑफ स्टाफ जनरल सीक्यू ब्राऊन यांनाही अशाचप्रकारे तडकाफडकी पदावरून हटवलं होतं.

अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराणविरोधी युद्ध धोरण, महागाई आणि इमिग्रेशन कायद्यांविरुद्ध तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. अमेरिकेत सुमारे 50 राज्यांत लाखो नागरिक 'नो किंग्स' रॅलींद्वारे आम्हाला राजा नको, लोकशाही हवी अशी घोषणा करत ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

याच पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी आता त्यांच्या इराण काही अधिकारी ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आक्रमकपणे कारवाई करताना त्यांच्या युद्धखोर भूमिकेविरोधात अधिकाऱ्यांना थेट तातडीनं पदावरून हटवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आपल्या निर्णयांना विरोध करेन, आवाज उठवेन, वा त्यांचे आदेश झुगारेल, त्याला तत्काळ पदावरून दूर करण्याचे सत्र ट्रम्प यांनी अवलंबले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धात्मक धोरणाला अमेरिकेतूनच आता मोठा विरोध केला जात असल्याचे समोर येत आहे. माघार तर सोडाच पण अमेरिकेलाही जोरदार हल्ल्यांनी प्रत्युत्तर करत चिवट इराण न झुकण्य़ाच्या भूमिकेत दिसून येत आहे. एकीकडे ट्रम्प यांचा अंदाज फोल इराणनं अमेरिकेला नाकीनऊ आणलं आहे. त्यातच पेंटागनमध्ये या युद्धामुळे अत्यंत तणावाचे वातावरण आहे.

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ यांनी रँडी जॉर्ज यांना व्यक्तिगतरित्या निवृत्त होण्यास सांगितले आहे. पेंटागनचे प्रवक्ते शीन पारनेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जॉर्ज यांना 41 व्या चीफ ऑफ आर्मी स्टाफचे पद सोडण्यास सांगण्यात आले. तात्काळ प्रभावाने त्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली. जनरल जॉर्ज यांना 2023 मध्ये बायडेन यांच्या सरकारमध्ये नियुक्ती देण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT