Jayant Patil News: महायुतीतील नेत्यांनाच हाताशी धरून 8 बैठकांमध्ये ठरवली रणनीती, जयंत पाटलांनी टप्प्यात आणून पडळकरांचा डाव उधळला

Jayant Patil And Gopichand Padalkar: सांगली जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या महायुतीतील विरोधकांसोबत तब्बल आठ बैठका घेऊन रणनीती ठरवली. व ती तडीस नेली. त्याला केवळ भाजपला विरोध म्हणून नव्हे तर आमदार पडळकर गट नको म्हणून ती यशस्वी झाली.
jayant Patil-gopichand padalkar
jayant Patil-gopichand padalkarSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीने सत्तास्थापन केली असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात ही लढत झाल्याची मानली जाते. आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या टीका-टिप्पणीमुळे नाराज झालेल्या विरोधकांना सोबत घेण्यात जयंत पाटील यशस्वी ठरले अन् आमदार पडळकरांचा करेक्ट कार्यक्रम झाला.

सांगली जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्या महायुतीतील विरोधकांसोबत तब्बल आठ बैठका घेऊन रणनीती ठरवली. व ती तडीस नेली. त्याला केवळ भाजपला विरोध म्हणून नव्हे तर आमदार पडळकर गट नको म्हणून ती यशस्वी झाली.

जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुती एकसंघ लढली. मात्र निवडणुकीपूर्वीच काही जागांवर एकमत न झाल्याने दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढली. मात्र अंतर्गत अंडरस्टॅण्डिंग ठेवून झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर भाजप हा दोन नंबरचा पक्ष ठरला. पण महायुती म्हणून सांगली जिल्हा परिषदेत मजबूत असताना आमदार गोपीचंद पडळकरांची अनेक नेत्यांशी असलेली दुश्मनी कारणीभूत ठरली. महायुतीकडे काठावरचे बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेस हा जयंत पाटील यांच्यासोबत गेला.

तर आमदार पडळकर यांचे विरोधक आमदार सुहास बाबर यांच्या गटाचे तानाजी पाटील यांना हाताशी धरून जयंत पाटलांनी खेळ्या केल्या अन् आमदार पडळकरांना चेकमेट दिला. शिवाय पडळकरांच्या जत या मतदारसंघात व आटपाडी या त्यांच्या होम ग्राऊंडवर दोन सभापतीपदे देत त्यांनी पुढच्या डावासाठीही चाल खेळली.

jayant Patil-gopichand padalkar
Satara ZP : सभापती निवडीपूर्वीच साताऱ्यात मोठी घडामोड : मंत्री जयकुमार गोरेंनी अचानक केली ZP इमारतीची पाहणी; भाजपच्या स्ट्रॅटेजीची पुन्हा चर्चा

सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आमदार गोपीचंद पडळकर हे भाजपच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे आक्रमक राजकारण जिल्ह्यात चर्चेत राहिले. आमदार सुहास बाबर गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधकांना बळ देणे. दिवंगत आर आर पाटील यांच्याविरोधात प्रत्यारोप करणे, माजी आमदार विलासराव जगताप, तानाजी पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात सातत्याने जहरी टीका करणे. त्यामुळे आमदार पडळकर यांची कारकीर्द चांगलीच गाजली आहे. पण तितकेच विरोधक तयार झाले.

वंचित बहुजन आघाडीत असताना समतावादी विचार मांडणारे आमदार पडळकर भाजपमध्ये गेल्यानंतर कधी कट्टर हिंदुत्ववादी झाले हेच कळले नाही. मात्र त्यांनी राजकारणातील आक्रमकपणा कायम ठेवला आहे.

jayant Patil-gopichand padalkar
Satara ZP Update : सभापती निवडीसाठी सातारच्या कलेक्टरांनी घेतला कडक निर्णय; झेडपीच्या 100 मीटर परिसरात...

एकाचवेळी अनेकांशी दुश्मनीचा हा खेळ जिल्हा परिषदेच्या राजकारणात त्यांच्या अंगलट आला. भाजपचे जे मित्रपक्ष सत्तेसाठी सहज सोबत येणार होते तेच सत्ताकारणाच्या अडून बसले. आणि भाजपला जिल्हा परिषदेमध्ये सहज वाटणारा डाव अवघड झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com