Iran-US conflict triggers global oil crisis; Iran denies taxing India ships. Get latest updates on fuel shortage and geopolitical tensions. Sarkarnama
देश

India iran relations : होर्मुझ सामुद्रधुनीतून येणाऱ्या भारतीय जहाजांकडून टोल घेता? इराणचे दुतावास म्हणाले, "तुमच्या सरकारला विचारा..."

iran oil exports india : अमेरिका आणि इस्राइलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनीवर निर्बंध आणले आणि संपूर्ण जगाची कोंडी केली. या युद्धाच्या झळा भारताला देखील बसल्या होत्या. मात्र, भारताच्या विनंतीनंतर युद्धाच्या परिस्थितीतही इराणने अनेक तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने सोडण्यास परवानगी दिली होती.

Jagdish Patil

India iran relations : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधन आणि गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्राइलच्या हल्ल्यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनीवर निर्बंध आणले आणि संपूर्ण जगाची कोंडी केली.

या युद्धाच्या झळा भारताला देखील बसल्या होत्या. मात्र, भारताच्या विनंतीनंतर युद्धाच्या परिस्थितीतही इराणने अनेक तेलवाहू जहाज भारताच्या दिशेने सोडण्यास परवानगी दिली. मात्र, या जहाजांवर भारताला कर भरावा लागला होता, अशा बातम्या समोर येत होत्या.

मात्र, भारतावर आम्ही कोणत्याही प्रकारचा कर लादला नसल्याचं इराणने स्पष्ट केलं आहे. इराणचे दुतावास फथअली यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी फथअली यांनी आमचे भारत सरकारशी चांगले संबंध असल्याचं स्पष्ट केलं.

तर आम्हाला भारत सरकारला मदत करायची असून त्यांनीही या दिवसांत आम्हाला मदत केल्याचं सांगितलं. तसंच आमचा नौकानयन स्वातंत्र्यावर विश्वास आहे आणि आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांशी बांधील आहोतच. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी हे इराण आणि ओमानचे प्रादेशिक जलक्षेत्र असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

पत्रकारांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्यासाठी भारतीय जहाजांना पैसे द्यावे लागतात का? असा प्रश्न विचारताच "भारताने पैसे दिले आहेत की नाही, हे तुम्ही भारत सरकारला विचारू शकता. इराण आणि भारत या दोन्ही देशांचे हितसंबंध समान आहेत आणि भविष्यातही चांगले राहतील, असा आमच्या उच्चपदस्थांचा विश्वास आहे," असं फथअली म्हणाले.

दरम्यान, यावेळी त्यांनी अमेरिका बेकायदेशीर मागण्या करणे थांबवल्यास इराण अमेरिकेसोबत पुन्हा एकदा चर्चेसाठी तयार आहे. अमेरिकेने आमच्या अटी मान्य केल्या तर चर्चा शक्य असल्याचंही ते म्हणाले. मात्र, तिकडे इराण अमेरिकेतील युद्ध विरामासाठी आयोजित केलेली पाकिस्तानातील शांती वार्ता निष्फळ ठरल्याने अमेरिका चांगलीच संतापली असून कालच युएस सेंट्रल कमांडने थेट इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

युएस सेंट्रल कमांडने थे इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या जहाजांवर ही नाकेबंदी कोणत्याही पक्षपाताशिवाय लागू केली जाणार असल्याचं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील संघर्ष कधी थांबणार याकडे अवघ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT