Strait of Hormuz Crisis : पाकिस्तानातील शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर आणि इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यामुळे अमेरिकेने कठोर पावलं उचलायला सुरुवात केल्याचं दिसत आहे. त्यामुळेच आता युएस सेंट्रल कमांडने जाहीर केलं आहे की, ते आज (सोमवार, १३ एप्रिल) रोजी सकाळी १०:०० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता इराणच्या बंदरांची नाकेबंदी सुरू करणार आहेत.
त्यानुसार इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या जहाजांवर ही नाकेबंदी कोणत्याही पक्षपाताशिवाय लागू केली जाणार असल्याचं युएस सेंट्रल कमांडने स्पष्ट केलं आहे.
यूएस सेंट्रल कमांडने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या नाकेबंदीची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनुसार अमेरिकेचे सैन्य १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीची नाकेबंदी करण्यास सुरुवात करेल. ही नाकेबंदी सर्व देशांच्या जहाजांविरुद्ध निःपक्षपातीपणे लागू केली जाईल.
यामध्ये अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातातील इराणच्या सर्व बंदरांचा समावेश आहे. मात्र याचवेळी जी जहाजं इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा करणार आहेत. त्यांच्या जहाजांच्या प्रवासात सेंटकॉमचे सैन्य कोणताही अडथळा आणणार नसल्याचंही युएस सेंट्रल कमांडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्यामुळे आता अमेरिकेकडून इराणच्या समुद्री वाहतुकीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी तात्काळ लागू होईल. शिवाय अमेरिकेच्या नौदलाला, आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात इराणला कोणतंही शुल्क दिलेल्या कोणत्याही जहाजाचा शोधून त्याला अडवण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यामुळे थेट होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश दिसत आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या या निर्णयानंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर सध्याची अमेरिकेची आणि इराणची भूमिका बघता या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.