Iran-US conflict triggers global oil crisis; Iran denies taxing India ships. Get latest updates on fuel shortage and geopolitical tensions. Sarkarnama
देश

Iran-US Row: पेट्रोल-डिझेलं संकट दूर होणार! हार्मुझची सामुद्रधुनी खुली होण्याचा मार्ग मोकळा; US-Iran शांतता कराराच्या मसुद्यावर सहमती

Iran-US Peace Accord: इराणनं म्हटलं की, अमेरिकेसोबतचा शांतता कराराचा एक प्राथमिक मसुदा तयार झाला असून यामुळं हार्मुज जलमार्गातील व्यावसायिक जहाजांची वाहतूक पुन्हा सुरु होऊ शकते.

Amit Ujagare

Iran-US Peace Accord: इराण-अमेरिका युद्धामुळं अवघ्या जगावर आलेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर येत आहे. या बातमीनुसार, या दोन्ही देशांमधील शांतता कराराच्या मसुद्याला दोन्ही पक्षांची सहमती झाली आहे. याबाबत इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं आता हार्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू आणि व्यापारी जहाजांची वाहतूक कुठल्याही निर्बंधांशिवाय पुन्हा सुरु होऊ शकतात. त्यामुळं याचा सर्वाधिक दिलासा हा भारताला मिळणार असून सध्या देशात निर्माण झालेली इंधनाची कमतरता आणि दरवाढ त्यामुळं नियंत्रणात येण्यास मदत होऊ शकते.

शांतता कराराच्या मसुद्यात काय?

इराण-अमेरिका शांतता कराराच्या मसुद्यात म्हटलंय की, इराणनं महिन्याभरात हार्मुझ सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जलवाहतूक युद्ध सुरु होण्यापूर्वी ज्या सहजतेनं सुरु होती त्याच सहजतेनं पुन्हा सुरु करावी. त्याचबरोबर अमेरिकेनं इराणच्या आसपास जे आपले सैन्य तैनात केलं आहे ते हटवले जातील तसंच इराणी नौदलावरील नाकाबंदी मागे घेतली जाईल.

बहुस्तरीय शांतता प्रक्रिया

इराणची वृत्तसंस्था मिजाननं या कराराबाबत अधिक विस्तारानं माहिती दिली आहे. यामध्ये ही शांतता प्रक्रिया बहुस्तरीय शांतता प्रक्रिया असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की, ६० दिवसांमध्ये या शांतता करारावर अंतिम निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे या कराराला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका बंधनकारक प्रस्तावाच्या स्वरुपात मंजुरी दिली जाईल.

हार्मुझची सामुद्रधुनी हा सर्वात महत्वाचा समुद्री व्यापारी मार्ग आहे. या मार्गात कुठल्याही सैन्य हालचालीचा परिणाम जागतिक तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर पडतो. त्याचमुळं अमेरिका या भागात सातत्यानं सैन्याद्वारे लक्ष ठेवून आहे.

इराणच्या युरेनियमवर ट्रम्प बोलले

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संवर्धित युरेनियमवरुन मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, इराणचं संवर्धित युरेनियमचा साठा एकतर अमेरिकेकडं सोपवला कारण तो नष्ट केला जाईल किंवा इराणच्यासोबतीनं तो आहे त्या ठिकाणीच नष्ट केला जाईल. दरम्यान, दोन्ही देशांमधील आण्विक कराराच्या चर्चा देखील पुढे जात असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडं इराणनं देखील हे मान्य केलं आहे की, अनेक मुद्द्यांवर सहमती झाली आहे, पण अमेरिकनं अधिकाऱ्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळं ही चर्चा जटील बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT