Siddaramaiah: अखेर संकटमोचकासमोर सिद्धरामय्या झुकले! कर्नाटकात नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा दिवस अन् वेळ ठरली

CM Shivkumar: कर्नाटकातील राजकीय घडमोडींना आता वेग आला असून राज्यात नेतृत्वबदल निश्चित झाला असून लवकरच नव्या मुख्यमंत्र्याच्या आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे.
chief minister dk shivkumar swearing in ceremony
chief minister dk shivkumar swearing in ceremony Sarkarnama
Published on
Updated on

CM Shivkumar: कर्नाटकातील राजकीय घडमोडींना आता वेग आला असून राज्यात नेतृत्वबदल निश्चित झाला असून लवकरच नव्या मुख्यमंत्र्याच्या आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. यासाठी काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून अखेर त्यांना काँग्रेसनं न्याय दिल्याची भावना राजकीय वर्तुळातून उमटत आहे.

chief minister dk shivkumar swearing in ceremony
Congress Crisis : काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, जिल्हाध्यक्षाची तडकाफडकी हकालपट्टी, 50 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने खळबळ

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी काँग्रेसनं संकटमोचक असलेल्या डी. के. शिवकुमार यांना महाराष्ट्रात पाठवून पेचप्रसंगात तोडगा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. त्यानंतर कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता खाली खेचून काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळंच निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी डी. के. शिवकुमार यांच्याच नावाची चर्चा सर्वाधिक होती. पण राजकीय आणि सामाजिक गणितं सांभाळण्यासाठी पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळी शिवकुमार यांचं नाव मागे पडल्यानं अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. पण काँग्रेसनं आता योग्य वेळी योग्य निर्णय घेत कर्नाटकात नेतृत्वबदल घडवून आणत डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकल्यानं या संकटमोचकाला न्याय दिल्याचं बोललं जात आहे.

chief minister dk shivkumar swearing in ceremony
Sugar Factory Elections : अहिल्यानगरच्या सहकाराच्या राजकारणात राजकीय रणधुमाळी; ‘ज्ञानेश्वर’, ‘मुळा’ अन् ‘वृद्धेश्वर’ची निवडणूक रंगणार

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?

कर्नाटकात मुख्यमंत्र्यासह ४ उपमुख्यमंत्री देखील असणार आहेत. यामध्ये या प्रमुख पाच पदांमध्ये जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. त्यानुसार, मुख्यमंत्रीपदी लिंगायत समाजाचे डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील. तसंच इतर चार उपमुख्यमंत्र्यांमध्ये एक OBC, एक दलित, एक अल्पसंख्यांक समाजाचा असेल असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

chief minister dk shivkumar swearing in ceremony
ममता बॅनर्जींना पहिला धक्का महिला खासदाराकडून; पदाचा राजीनामा देणाऱ्या काकोली घोष कोण?

सिद्धरामय्या उद्या देणार राजीनामा

दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे उद्या आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सिद्धरामय्या आपला राजीनामा राज्यपालांकडं सोपवतील. त्यासाठी २८ मे सकाळी ११ वाजताची राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची अपॉईंटमेंट त्यांनी घेतली आहे. तत्पूर्वी सिद्धरामय्या संपूण मंत्रिमंडळासाठी आपल्या बंगळुरु येथील शासकीय निवासस्थानी ब्रेकफास्ट मिटिंग आयोजित करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला हे देखील गुरुवारी बंगळुरुत दाखल होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com