India issues advisory amid Iran US war tension Sarkarnama
देश

Iran USA War: "ट्रम्पपेक्षा तुमचा मुलगा आमच्याजवळ जास्त सुरक्षित"; इराणचा अमेरिकन पायलटच्या आईला संदेश

Iran USA War: इराणननं शुक्रवारी अमेरिकेची दोन फायटर जेट पाडली. यामध्ये एक F15 आणि दुसरं A-10 फायटर जेट होतं. या हल्ल्यातील एका पायलटला वाचवण्यात यश आलं आहे.

Amit Ujagare

Iran USA War: इराणननं शुक्रवारी अमेरिकेची दोन फायटर जेट पाडली. यामध्ये एक F15 आणि दुसरं A-10 फायटर जेट होतं. या हल्ल्यातील एका पायलटला वाचवण्यात यश आलं आहे. पण दुसऱ्या पायलटचा अद्याप पत्ता लागलेला नाही. या बेपत्ता झालेल्या पायलटच्या आईनं सोशल मीडियातून आपल्या मुलाबाबत चिंता व्यक्त केली होती. पण या आईला इराणनं एक संदेश दिला आहे. ट्रम्पपेक्षा तुमचा मुलगा आमच्याकडं जास्त सुरक्षित आहे, असं या संदेशात म्हटलं आहे.

अमेरिकनं जेट विमानाचा जो पायलट इराणमध्ये बेपत्ता झाला आहे त्याच्या आईनं सोशल मीडियात लिहिलं की, "आजच्या रात्री त्या दोन फायलट पायलट्ससाठी प्रार्थना करा जी विमानं काल युद्धादरम्यान पाडली गेली आहेत. माझा एक मुलगा फायटल पायलट असून मला अद्याप त्याची किंवा त्याच्या युनिटची खबर मिळालेली नाही. त्यामुळं मला त्याची खूपच चिंता वाटते आहे. कृपया सर्व पायलट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा"

दरम्यान, इराणच्या पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेत असलेल्या दुतावासानं या अमेरिकनं फायटर पायलटच्या आईला उत्तर देताना म्हटलं की, तुमच्या मुलाला इराणच्या ताब्यात राहण्यापेक्षा जास्त धोका हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत राहण्यात आहे. या दोन्ही इराणी दुतावासांनी ट्विट करत इराणच्या कैद्यांसोबत केला जात असलेल्या दुर्व्यवहारावर त्यांनी जोर दिला.

पाकिस्तानी दुतावासानं म्हटलं की, तुमची मुलं ही ट्रम्पपेक्षा इराणमध्ये जास्त सुरक्षित आहेत. प्रार्थना करा की इराणच्या ताब्यात त्यांनी कैदी म्हणूनच राहावं. अमेरिकन रेस्क्यु टीमच्या हाती लागू नये, आम्ही मुसलमान आणि सभ्य इराणी आहोत. आम्ही कैद्यांसोबत इज्जत आणि सन्मानानं वागतो. तर दक्षिण अफ्रिकेतील इराणी दुतावासानं म्हटलं की, इराणमध्ये खूप आधीपासून जेव्हा जगात माणवी कायदे देखील नव्हते तेव्हापासून युद्धकैद्यांचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. आम्ही आमच्या युद्धकैद्यांसोबत असं वागत नाही जसं तुमचे जंगली सहकारी जियोनिस्ट (इस्रायल) करत आहेत. आमची इराणी संस्कृती अशी आहे की आम्ही पाषाण युगासारखे जगत नहाी जसं अमेरिका जगते आहे.

जिनिव्हा कन्व्हेंशन 1949 काय म्हणतो?

अमेरिकन पायलट जर इराणच्या ताब्यात सापडला तर त्याला युद्धकैदी मानलं जातं. जर कोणी सैन्य पायलट शत्रू राष्ट्राच्या हद्दीत पकडला गेला तर त्याला सामान्य कैदी नव्हे तर युद्धकैदी मानलं जातं. जिनिव्हा कन्व्हेंशन 1949 नुसार, हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, युद्धात पकडण्यात आलेल्या सैनिकांना कायदेशीर सुरक्षा मिळत राहील. याचाच अर्थ असा आहे की, जर कोणताही अमेरिकन पायलट इराणच्या ताब्यात आला तर त्याला युद्धकैदी मानलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT