West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये अमित शहांच्या 'रोड शो' दरम्यान गोंधळ! निवडणूक आयोगाकडून 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचा अर्ज भरण्यासाठी थेट अमित शहा यांनी हजेरी लावली, त्यांनी शक्तीप्रदर्शन करत रोड शो केला.
West Bengal Amit Shah Road Show
West Bengal Amit Shah Road Show
Published on
Updated on

West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दोन दिवसांपूर्वी अमित शहांचा रोड शो पार पडला. यावेळी गोंधळ निर्माण झाल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत निवडणूक आयोगाकडून ४ पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळं आता पश्चिम बंगालमधील राजकारण पुन्हा ढवळून निघण्याची शक्यता आहे.

West Bengal Amit Shah Road Show
Jay Pawar: अजितदादांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी जय पवारांनी कसली कंबर; केला 'हा' खास प्लॅन

अमित शहांच्या रोड शोमध्ये गोंधळ

दोन दिवसांपूर्वी भवानीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्यावतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रोड शोचं आयोजन करण्यात आलं होत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुवेंदू अधिकारी हे या भवानीपूर मतदारसंघातून थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठीच हा रोडशो आयोजित करण्यात आला होता. हा रोड शो मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरासमोरुन जात असताना तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि गोंधळ निर्माण झाला.

सुवेंदू अधिकारी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना शक्तीप्रदर्शन केलं. यासाठी थेट अमित शहांचा रोड शोच ठेवण्यात आला होता. या रोड शोच्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी निषेधांच्या घोषणा दिल्या. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर गोळा झाल्यानं मोठी गर्दीही झाली होती. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षांचे झेंडे मोठ्या प्रमाणावर फडकवले. तसंच जेव्हा ममता बॅनर्जींच्या घराजवळ हा रोड शो आला तेव्हा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी 'सुवेंदू अधिकारी चोर है' अशी घोषणाबाजी केली. यामुळं अमित शहा आपल्या वाहनातून आलिकडेच उतरुन दुसर्या मार्गानं निघून गेले. केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा रोड शो असल्यानं सहाजिकच तो हायसिक्युरिटी रोड शो होता, असं असतानाही गोंधळ निर्माण झाल्यानं,पण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावेळी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या नाहीत, असा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे.

West Bengal Amit Shah Road Show
Jay Pawar: अजित पवारांच्या अपघातप्रकरणी पुत्र जय पवार यांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका; संशय व्यक्त करताना म्हणाले...

तातडीनं निलंबन अन् रिक्त जागा भरण्याचे आदेश

दरम्यान, थेट केंद्रीय निवडणूक आयोगानं या गोंधळाच्या परिस्थितीची तातडीनं दखल घेत चार स्थानिक पोलीस अधिकाऱ्याचं तातडीनं निलंबन केलं. या कारवाईच्या अधिकृत पत्रात निवडणूक आयोगानं म्हटलं की, आम्हाला ३ एप्रिल २०२६ रोजी पश्चिम बंगालच्या सीईओंकडून पत्र मिळालं आहे. यामध्ये कोलकाता पोलिसांच्या दक्षिण विभागाचे DC-II सिद्धार्थ दत्ता, अलिपूरचे OC प्रियांक चक्रवर्ती, अलिपूरचे अतिरिक्त OC चंडीचरण बॅनर्जी, अलिपूरचे सार्जंट सौरभ चॅटर्जी यांना निलंबित आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून कारवाईची शिफारस करण्यात आलेल्या या ४ पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीनं निलंबणाची कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. त्यानुसार, तातडीनं ही कारवाई करुन याचा अहवाल ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत सुपूर्द करण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर रिक्त झालेल्या जागा तातडीनं भरण्यात याव्यात असेही निर्देश देण्यात आले आहेत, असंही निवडणूक आयोगाच्या पत्रात म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे सचिव सुजित कुमार मिश्रा यांच्या सहीनं निवडणूक आयोगानं हे कारवाईचे आदेश दिल्लीतून काढले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com