India crude oil Sarkarnama
देश

India crude oil import bill : इराण युद्धाचा भारताला फटका; महाग तेलामुळे किती वाढणार आर्थिक भार?

US-Iran tensions push global oil prices higher, raising India's crude import burden and inflation risks : होरमुझमधील तेल वाहतुकीवर परिणाम; भारताचा कच्च्या तेलाचा आयात खर्च एप्रिल-जूनमध्ये 61 टक्क्यांनी वाढला, रुपयावर आणि महागाईवर दबाव वाढण्याची शक्यता.

Pradeep Pendhare

Crude Oil Price : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्तपणे केलेल्या लष्करी हल्ल्यामुळे 28 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष युद्धाची सुरुवात झाली. या थेट संघर्षानंतर अजूनही दोन्ही बाजूंनी लष्करी कारवाया आणि तणाव कायम आहे.

अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक खनिज तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. होरमुझच्या सामुद्रधुनीतील तेल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.

ब्रेन्ट क्रूड (Oil Price) हा जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती ठरवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख मापदंड आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात ब्रेन्ट क्रूडच्या किमती प्रति बॅरल 120 डॉलरच्या आसपास पोहोचल्या. त्यानंतर तणाव कमी होण्याच्या शक्यतेने जूनमध्ये दर सुमारे 68 डॉलरपर्यंत खाली आले.

मात्र, संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याने सप्टेंबरच्या सुरुवातीला तेलाचे दर पुन्हा 100 प्रति बॅरल डॉलरच्या आसपास पोहोचले आहेत. चार सप्टेंबरला प्रतिपिंप 101.07 डॉलर दराची नोंद झाली.

भारत (India) तेलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारातील तेलदरवाढीचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर होतो. मे 2026 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. महाग तेलामुळे भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागत असल्याने रुपयावर दबाव वाढला आहे.

भारताने खनिज तेल आयातीवर गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तीन महिन्यांत 60 टक्के जास्त खर्च केला, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक मंत्रालयाच्या नियोजन आणि विश्लेषण कक्षाने दिली.

आयात खर्चातील वाढ सुरूच असल्यामुळे त्याचा परिणाम केवळ पेट्रोल-डिझेलपुरता मर्यादित नाही. वाहतूक खर्च वाढल्याने विविध वस्तू आणि सेवांच्या किमतींवरही दबाव येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT