Delhi News : एक देश-एक निवडणुकीसाठी (One Nation One Election) मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. याच्या चाचपणीसाठी सरकारकडून समितीही स्थापन करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज चालणार आहे. मात्र, 'एक देश-एक निवडणूक' ही योजना भारतासारख्या खंडप्राय देशात कितपत शक्य होईल, यात जाणकारांमध्ये मतमतांतरे आहेत. यावर आता विधी आयोगाने आपले मत व्यक्त केले आहे. (Latest Marathi News)
एक देश- एक निवडणुकीसंदर्भात चर्चा होत असताना आता विधी आयोगाने यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. एक देश - एक निवडणूक पद्धतीने निवडणुका २०२९ नंतर घेणे संयुक्तिक ठरले, आगामी २०२४ च्या निवडणुकीत एकत्रितपणे निवडणुका घेणे शक्य होणार नाही, असे विधी आयोगाने म्हटले आहे. मात्र, विधी आयोगाचा अहवाल सादर होण्यास वेळ लागणार आहे.
विधी आयोग एक देश-एक निवडणुकीबाबत कालबद्ध आराखड्याचा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे. २०२४ आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अंमलबजावणीचा कालबद्ध संभाव्य आराखडा तयार करत असल्याची माहिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ आणि २०२९ या दोन लोकसभा निवडणूक चक्रादरम्यान (इलेक्शन सायकल) एकत्रित निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याची शिफारस विधी आयोगाकडे केली आहे.
तसेच, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याद्या एकत्रित करण्याच्या सूचना विधी आयोग देणार असल्याचीही माहिती आहे. निवडणुका एकत्रितपणे घ्यायच्या असतील, तर कायद्यात काही बदल करावे लागणार आहेत. मात्र, एखाद्या राज्यात अविश्वास ठरावावेळी सरकार कोसळलं किंवा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, तर अशा वेळी नक्की काय उपाययोजना करायच्या? यावरही विधी आयोग चर्चा करत असल्याची माहिती आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.