Israel officially backs India’s Operation Sindoor air strike, calling it a strong step against terrorism. sarkarnama
देश

Operation Sindoor India : ऑपरेशन सिंदूर अमेरिकेला झोंबलं! भारताच्या मदतीला मोठा देश धावला, समर्थन करत म्हटलं, 'कुठेही लपा...'

Israel Backs India Operation Sindoor : ट्रम्प यांना भारताच्या एअर स्ट्राईक विषयी विचारले असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल.

Roshan More

Operation Sindoor Update : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाई करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक केले. तब्बल 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे हल्ले नष्ट करण्यात आले. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले'इट इज शेम'

ट्रम्प यांना भारताच्या एअर स्ट्राईक विषयी विचारले असता ते म्हणाले, आम्ही याबाबत ऐकलं आहे. इट इज शेम, अपेक्षा आहे की हे सर्व लवकरात लवकर संपेल. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेमुळे अमेरिकेला ऑपरेशन सिंदूर झोंबल्याची चर्चा आहे. मात्र, यामध्ये इस्त्रायलने उघडपणे भारताच्या कारवाईचे समर्थन केले.

इस्त्रायलचे भारतातील राजदूत रेउवेन अझर यांनी म्हटले आहे की, आत्मरक्षणासाठी भारताने केलेल्या कारवाईचे इस्त्रायल समर्थन करतो. आतंकवाद्यांना हे माहीत असायला हवे की त्यांना निरपराध नागरिकांना मारून लपयला कुठेच जागा नाही. रेउवेन अझर यांनी ट्विटकरताना ऑपरेशन सिंदूर हे हॅशटॅग देखील वापरले आहे.

पाकिस्तानकडून हल्ल्याची कबुली

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या ट्विटरवरून भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्याची माहिती दिली आहे. भारताने पाकिस्तानच्या पाच ठिकाणांवर हल्ला केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्ता याचे प्रत्युत्तर देईल, असे देखील सांगितले आहे.

लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या लश्कर ए तोयबाचे, जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार भारताने केलेल्या स्ट्राईमध्ये तब्बल 80 ते 90 दहशतवादी मारले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT