Asaduddin Owaisi On Operation Sindoor : पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, असुद्दीन ओवैसींचे पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,...

Operation Sindoor Air Strike On Pakistan : भारतीय लष्कराने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. यावर एमआयएमचे प्रमुख, खासदार , असुद्दीने औवीसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे
Asaduddin Owaisi gives his first statement on the Indian Army’s Operation Sindoor air strike targeting Pakistan.
Asaduddin Owaisi gives his first statement on the Indian Army’s Operation Sindoor air strike targeting Pakistan. Sarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi News : पहलगाम हल्ल्यानंतर 12 दिवसांनी भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानच्या हद्दीत घूसून एअर स्ट्राईक केले. तब्बल 9 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले तसेच 80-90 दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. भारताच्या एअर स्ट्राईकचे स्वागत एमआयएमचे प्रमुख, खासदार , असुद्दीने ओवैसी यांनी केले आहे.

असुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर आपल्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे मी स्वागत करतो. पाकिस्तानी डीप स्टेटला कठोर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून दुसरी पहलगाम पुन्हा कधीही घडणार नाही. पाकिस्तानचे दहशतवादी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट केले पाहिजेत, जय हिंद.'

Asaduddin Owaisi gives his first statement on the Indian Army’s Operation Sindoor air strike targeting Pakistan.
Operation Sindoor Pakistan Army : भारताचा एअर स्ट्राईक, पाकिस्तानी लष्कराची कबुली, म्हणाले, 24 हल्ले अन्...

पहलगाम हल्ल्यानंतर देखील ओवैसी यांनी या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा करत थेट पाकिस्तानवर कारवाईची मागणी केली होती. या हल्ल्याचे कधीच समर्थन करता येणार नसल्याचे औवेसी यांनी म्हटले होते. तसेच भारतीय लष्कर पाकिस्तानला धडा शिकवण्यास सक्षम असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला होता.

पाकिस्तानकडून गोळीबार

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानमध्ये गोंधळाची स्थिती आहे. पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानच्या लष्कराकडून हल्ल्याची कबुली

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लष्कराचे अधिकृत निवेदन समोर आले आहे. पाकिस्तानने भारताकडून 6 ठिकाणी हल्ले करण्यात आल्याचे म्हटले आहे. मृत्यांच्या आकड्यांची देखील पाकिस्तानी लष्कराकडून लपवाछपवी करण्यात आली असून सहा पाकिस्तानी नागरिक मारले गेल्याची तसेच 33 जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

Asaduddin Owaisi gives his first statement on the Indian Army’s Operation Sindoor air strike targeting Pakistan.
Operation Sindoor : भारताची कारवाई अमेरिकेला झोंबली! ऑपरेशन सिंदूरला लज्जास्पद म्हणत ट्रम्प यांनी दोन्ही देशांना केलं मोठं आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com