India Air Strike News : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून 9 ठिकाणी एअर स्ट्राईक केले. यामध्ये 90 दहशतवाद्यांचा खात्म झाल्याची माहिती आहे. भारताकडून झालेल्या या कारवाईनंतर पाकिस्तान लष्कराकडून अधिकृत निवेदन करण्यात आले आहे.
पाकिस्तान लष्कराने हल्ल्यात झालेल्या नुकसानाची लपवाछपवी करत म्हटले आहे की, भारताने सहा ठिकाणी 24 हल्ले केले यामध्ये सहा नागरिक मारले गेले आहेत तर, 33 नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या ट्विटरवरून या हल्ल्याची माहिती देताना म्हटले आहे की, शत्रुने पाकिस्तानच्या पाच जागांवर हल्ला केला आहे. भारताकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याचे पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देईल. तर, पाकिस्तान लष्कराकडून दावा करण्यात आला की, भारताने कोटली, बहावलपूर आणि मुज्जफराबाद येथे मिसाईल हल्ला केला आहे.
भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकने बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि कश्मीरमध्ये असलेल्या नियंत्रण रेषा (LOC) येथे अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानाच्या हद्दीत असलेले दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत. तब्बल 80-90 दहशतवादी मारले गेल्याचे मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यात बहावलपूर आणि मुरीदके येथेच 25 ते 30 आतंकवादी मारले गेल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.